आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वजन कमी करण्यासाठी दररोज व्यायामासाठी एक तास बाजूला ठेवावा. त्यामुळे एका आठवड्यात शरीराच्या सर्व भागांचा व्यायाम होतो. फिटनेससाठी कार्डियोव्हस्क्युलर, स्ट्रेंथ ट्रेनिंग, लवचिकता, संतुलन आणि स्टेबिलिटी एक्सरसाइज केला जाऊ शकतो. वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि आहारात योग्य ताळमेळ राखणे गरजेचे आहे.
वजन घटविण्यासाठी व्यायाम करताना ३ दिवस कार्डियोव्हस्क्युलर, २ दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करावे. घरातच व्यायाम करण्यासाठी अडीच किलोच्या डम्बेल्सचा वापर करावा. जिम बॉल आणि बॅलेंस बोर्डचा वापरही करता येईल. संपूर्ण आठवड्यासाठी व्यायामाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे करावे.
कार्डिओव्हस्क्युलर एक्सरसाइज ३ दिवस करावे. कार्डियोव्हस्क्युलर एक्सरसाइजसाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी ३० ते ४० मिनिटे वॉक करावा. वेगाने चालावे. एका तासात ७ किलोमीटर अंतर पार करावे. तत्पूर्वी खांदे गोल फिरवून व्यायाम करावा. ताण कमी करून पाय रिलॅक्स करावेत. तसेच स्ट्रेंथ ट्रेनिंग २ दिवस करावे. मंगळवार आणि गुरुवारी शरीराच्या वरील तसेच खालच्या भागाचा व्यायाम करावा. डम्बेल्स सुरू करताना बायॅप्स, ट्रायॅप्स, खांदे, छाती आणि पाठीचा व्यायाम करावा. एक किंवा दोन व्यायाम दिवसातून १० ते १२ वेळा पुन्हा करू शकता. दुसऱ्या दिवशी शरीराच्या खालच्या भागाचा व्यायाम करावा. यात कमरेखालील भाग, जांघ, नितंब, पाय इत्यादी अवयव येतात. हा व्यायाम करताना पायाची टाच आणि पंजावरही योग्य लक्ष द्या.
आहारात काही पथ्ये पाळावीत. काही जण दिवसभरात फक्त दोन पोळ्या, भाजी, वरण आणि बिस्किटे खातात. तरीही त्यांचे वजन वाढतच राहते. पोळी किंवा चपातीत खूप कबरेदके असतात. समोसा, शीतपेये, बिस्किटे आणि इतर चटपटीत पदार्थ खावू नयेत. शाकाहारी लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते. जीवनशैली आणि आनुवंशिकता यामुळेदेखील स्थूलपणा येऊ शकतो. इतरही काही कारणांमुळे लठ्ठपणा वाढू शकतो. थायरॉइड सक्रिय नसेल तर वजन वाढू शकते. औषध उपचार सुरू असतील तेव्हा हार्मोन्समुळे वजन वाढले, असे म्हणता येणार नाही. आठवड्याच्या अखेरीस योग, अँरोबिक्स, डान्सिंगवर भर द्यावा. यामुळे शरीरावरील ताण कमी होईल.