वयाच्या विशिष्ठ टप्प्यानंतर वजन वाढते, ‘असे’ ठेवा नियंत्रणात

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पंचेचाळीशी गाठली की आरोग्यदायी जीवन जगण्याची इच्छा निर्माण होते. हे सुद्धा उशिरा सुचलेले शहाणपण असते. आधुनिक जीवनशैलीमुळे मनावर येणारा ताणतणाव शरीरासाठी घातक ठरत आहे. त्याचा परिणाम म्हणून वजन वाढते. एकदा वजन वाढले की, थकवा, रक्तदाब, मधुमेह, न्यूनगंड असे त्रास सुरू होतात. वजन वाढणे किती घातक आहे, हे यावरून दिसून येते. विशिष्ट वयात वाढणारे हे वजन नियंत्रणात आणण्यासाठी काही उपाय असून ते जाणून घेवूयात.

खरबूज 
ताजेपणासाठी खरबूज चांगले फळ आहे. यामध्ये केवळ ४५ कॅलरी असतात. गोड पदार्थांची आवड असल्यास खरबूज आरोग्यदायी आणि गोड पर्याय ठरू शकते.

पत्ताकोबी
आहारात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन केल्याने १० टक्के कॅलरी कमी करता येते. दररोज २ कप कोबीच्या पानांचा रस घेतल्यास ११३ टक्के अधिक मात्रेत व्हिटॅमिन-ए मिळते.

पनीर
वाढत्या वयाबरोबर स्नायू कमजोर होतात. यामुळे चयापचय प्रक्रिया क्षीण होते. व्हे-प्रोटीनपासून बनलेल्या कॉटेज पनीरमुळे स्नायू मजबूत होतात. याच्या सेवनाने वजन नियंत्रणात राहते.

अक्रोड
अक्रोडमधील प्रोटीन आरोग्यदायी असते. हे सडपातळ होण्यासाठी चांगले असते.

काळे सोयाबीन
काळ्या सोयाबीनच्या सेवनाने स्तनाचे कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. हे खाल्ल्याने चरबी वेगाने कमी करता येऊ शकते आणि वजनावरही नियंत्रण मिळवता येते.

तिखट
तिखटात चरबी कमी करणारे कॅस्पिनॉइड असते. एका स्वयंसेवकाने दररोज ६ ग्रॅम कॅस्पिनॉइड ऑइलचे सेवन केले असता त्याचे वजन ५ पट वेगाने कमी झाले, असे संशोधनात आढळून आले आहे.

बटाटे 
बटाटा खाणे कमरेसाठी सर्वाधिक घातक असते, असे एका सशांधनात समोर आले आहे. मात्र, हे तळलेल्या बटाट्याबद्दल सांगितले आहे. भाजलेल्या किंवा उकळलेल्या बटाट्यावर काळी मिरी आणि मीठ टाकून खाणे चांगला आहार आहे. रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी हे उपयुक्त आहे. बटाटे उकडून दह्यासोबत खाल्याने नुकसान होत नाही.