आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरातील ज्या भागावर चरबी वाढते त्यासंबंधीत कर्करोग होण्याचा धोका वाढतो. उच्च बॉडी मास इंडेक्स म्हणजेच बीएमआय व्यतिरिक्त पोटावर वाढलेली चरबी कर्करोगाला आमंत्रण देते, असे एका संशोधनात आढळून आले आहे. हे संशोधन फ्रांन्समध्ये इंटरनॅशनल एजेंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरमधील शास्त्रज्ञांनी केले आहे.
हे लक्षात ठेवा
१) चरबीमुळे होत असलेल्या कर्करोगात स्तन, आतड्याचा, गर्भाशय, अन्ननलिका, अन्नाशय, गुद्वार, यकृत, ह्रदय, पित्ताशय, ओवरी, घशाचा इत्यादी प्रकारच्या कर्करोगांचा समावेश आहे.
२) कमरेवर ८ सेंटीमीटर चरबीची वाढ आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका १५ टक्क्यांनी वाढवते.
३) धूम्रपानानंतर अतिरिक्त वजन हे कर्करोगाचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे. वेळीच हा धोका टाळा.
४) कमरेवर चरबीची प्रति ११ सेंटीमीटर वाढ लठ्ठपणाशी संबंधीत कर्करोग होण्याचा धोका १३ टक्क्यांनी वाढवते.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)