आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मानवी सौंदर्य खुलवण्यासाठी केसांची भूमिका महत्वाची असते. अनेक लोक केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरतात, पार्लरमध्ये तासनतास वेळ वाया घालवतात. काही लोक पांढरे केस लपवण्यासाठी किंवा इतरांपेक्षा हटके दिसावे म्हणून केसांना कलर करतात. मात्र पार्लरमध्ये जाऊन केसांवर पुष्कळ पैसे खर्च करून सुद्धा केसांना केलेला हेअरकलर काही दिवसांतच फिकट पडू लागतो. असे होऊ नये म्हणून कलर केलेल्या केसांची काळजी विशिष्ट पद्धतीने घ्यावी लागते. हेअरकलर दीर्घकाळ टिकावा यासाठी तर केसांची खालील पद्धतीने काळजी घ्या.
१ ) हेयर कलर करण्यापूर्वी केसांना शाम्पू लावून चांगल्या पद्धतीने स्वच्छ धुवा. केसांमध्ये जर घाम किंवा तेलकटपणा असेल तर केसांना कलर व्यवस्थित लागणार नाही. तसेच तो अधिक काळ टिकणारही नाही.
२) हेअरकलर केल्यानंतर किमान पुढील ७२ तास शॅम्पूचा वापर करू नका.
३) शॅम्पूनंतर कंडीशनर लावला जातो. पण तुम्ही केसांना हेअरकलर केला असेल तर शॅम्पूआधी कंडीशनर लावा.
४) केस धुताना अतिशय गरम पाणी वापरू नये. गरम पाण्यामुळे केस रुक्ष बनतात. तसेच केसांमध्ये असलेले नैसर्गिक मॉइश्चरही निघून जाईल.त्यामुळे केसांचा कलरही उडून जातो.
५) आठवड्यातून एकदा केसांना तेलाने मालिश करावी. त्यामुळे केस स्वस्थ्य आणि मजबूत होतात. यामुळे केसांची गळण्याची आणि कोंड्याची समस्या कमी होते. तसेच केसांचा कलर अधिक काळ टिकतो.