आरोग्यनामा ऑनलाईन – मजबूत, लांबसडक आणि दाट केस तुमच्या सौंदर्यासह कॉन्फिडंस सुद्धा बूस्ट करतात. पण यासाठी थोडी मेहनत करावी लागते. शॅम्पू करण्यापूर्वी तेल लावणे, शॅम्पूनंतर कंडीशनरचा वापर, ओल्या केसात कंगवा न घालणे इत्यादी काळजी घ्यावी लागते. आज आम्ही केस लांबसडक आणि दाट करण्यासाठी एका अशा तेलाबाबत सांगणार आहोत ज्याचा परिणाम एक ते दोन आठवड्यातच दिसू लागेल.
चुकूनही ‘हे’ 7 पदार्थ पुन्हा गरम खाऊ नका, अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता
मोहरी आणि मेथीदाण्यापासून तयार केलेले तेल
तुम्ही अवघ्या 10 मिनिटात 2 ते 3 महिन्याचे तेल तयार करू शकता. एवढे तेल एकदाच बनवून स्टोअर करू शकता, कारण हे तेल लवकर खराब होत नाही. मोहरी आणि मेथी दोन्ही केसांसाठी खुप लाभदायक आहे.
Blood Clot : हात-पायात वेदनांसह ‘या’ 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, ब्लड क्लॉटचे आहेत संकेत
असे तयार करा तेल
एका भांड्यात मोहरीचे तेल घ्या आणि यामध्ये मेथी दाणे टाकून रात्रभर ठेवा. दुसर्या दिवशी 5 ते 7 मिनिटांसाठी हे तेल मंद आचेवर तापवा. जेव्हा मेथीचे दाणे काळे होऊ लागतील तेव्हा गॅस बंद करा. नंतर तेल थंड होऊ द्या.
तेल वापरण्याची पद्धत
रात्री या तेलाने आपल्या केसांच्या मुळांचे मालिश करा आणि केंस विंचरून बांधून घ्या. यानंतर सकाळी शॅम्पू करा. यामुळे केस लवकरच लांबसडक आणि दाट होतील. चांगल्या परिणामासाठी सुरुवातीला आठवड्यात 3 वेळा या तेलाचा वापर करा.
टीप :
वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.
Read more :
कशामुळं घशा त काहीतरी अडकल्यासारखं वाटतं? जाणून घ्या त्याची कारणे अन् उपाय
एका रात्रीतून दूर होईल अंडरआर्म्सचं काळेपणा, ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या
डोळ्यांवर जमा झालेल्या कोलेस्ट्रॉलला हटविण्याचे ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या
वयाच्या 30 नंतर महिलांनी ‘या’ 5 टीप्स फॉलो कराव्यात, आयुष्यभर तंदुरूस्त रहाल, जाणून घ्या
तुमचे केस कधीही गळणार नाहीत, झोपेच्या आधी करा फक्त ‘या’ 6 गोष्टी
Beauty Secrets : घरबसल्या न घाबरता Eyebrow ला परफेक्ट शेप, जाणून घ्या
घरच्या घरीच ‘या’ 3 गोष्टींपासून बनवा Hand Sanitizer, नाही होणार त्वचेला एलर्जी, जाणून घ्या प्रक्रिया
तुम्हाला देखील झोपेत झटके येतात? जाणून घ्या कारण
रोगप्रतिकारकशक्ती ला नष्ट करतोय ‘हा’ आहार, जाणून घ्या