आरोग्यनामा ऑनलाईन टीम – उन्हाळ्यातील गर्मीपासून सुटका होण्यासाठी आपण पावसाळ्याची वाट पाहत असतो. पण पावसाळ्यात आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जसे उन्हाळ्यात मेकअप खराब होऊया नये म्हणून आपण काळजी घेतो. तसेच पावसाळ्यातही मेकअप करताना आपल्याला विषेश काळजी घ्यावी लागते. त्यासाठी तुम्ही जर खालील टिप्स वापरल्या तर तुमचा मेकअप अधिक काळ टिकण्यासाठी आणि चांगला होण्यासाठी मदत होईल.
१) पावसाळ्यात जास्त वेळ मेकअप टिकण्यासाठी तुम्ही वॉटरप्रूफ मेकअप करा. तुम्ही कॉम्पक्ट पाऊडर आणि फाऊंडेशनचा वापर करू शकता. यामुळे तुमचा मेकअप अधिक सुंदर दिसेल आणि जास्त वेळ टिकेलही.
२) पावसाळ्यात लिपस्टिक लावायच्या अगोदर वॉटरप्रूफ लायनर लावा. त्यानंतर वॉटरप्रूफ लीप कलर लावा. त्यामुळे पावसात भिजल्यानंतरही तुमची लिपस्टिक तशीच राहील.
३) पावसाळ्यात मेकअपच साहित्य खरेदी करताना त्या प्रोडक्ट्सची व्यवस्थित माहिती घ्या. की ते प्रॉडक्ट वॉटरप्रुफ आहे कि नाही. ते किती वेळ टिकेल. हे सगळं पाहूनच ते प्रॉडक्ट खरेदी करा.
४) पावसाळ्यात पाऊडर ब्लशपेक्षा क्रीमब्लशचा वापर करा. आणि तुम्हाला जर तुमचा कलर अधिक उजळवायचा असेल तर क्रीम ब्लशच्यावर पावडर ब्लश लावा. मग ते गालावर खूप वेळ टिकेल.
५) मेकअप करताना टोनर लावा. हे फक्त स्किनला स्वच्छ करत नाही तर मॉयस्चराइज़ पण करते. टोनर हे स्किन पोअर्स बंद करत करते.