या मेकअप टिप्समुळे तुम्ही सावळे असाल तरीही दिसाल सुंदर
पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पूर्वी गोरा रंग असेल तर मेकअप केला नाही तरी चालायचं. पण आता गोरा रंग असो किंवा सावळा तरी मेकअप केलाच जातो. पण ज्यांचा रंग जरा सावळा आहे. त्यांनी जर मेकअप केला तर तो जरा डार्क दिसतो. त्यामुळे ज्या स्रियांचा रंग काळा त्यांना मेकअप कसा करावा. ते समजत नाही. त्यामुळं त्यांना आम्ही चांगला मेकअप होण्यासाठी आणि काही टिप्स सांगत आहोत. मेकअप करताना या टिप्स वापरल्या तर तुम्ही नक्की सुंदर दिसाल.
सावळ्या रंगावर कसा मेकअप करावा त्यासाठी टिप्स पुढील प्रमाणे
१) फाऊंडेशन : आपण फाऊंडेशन खरेदी केल्यानंतर ते पहिल्यांदा आपल्या जॉ लाईन वर लावून पहा. कारण जॉ लाईनवर स्किन टोन क्लियर दिसत.आणि फाऊंडेशन मध्ये खूप शेड असतात. त्यामुळे दुकानातल्या लाईट पेक्षा बाहेरील प्रकाशात फाउंडेशन चेक करून पहा.
२) परफेक्ट पाउट: डस्की स्किनवर ग्लॉस आणि मेट दोन्ही प्रकारची लिपस्टिक चांगली लागते. आणि एकाच रंगाचे खूप शेड बाजारात उपलब्ध असल्यामुळे आपण कोणताही कलर घेऊ शकतो. हे सगळे रंग सावळ्या रंगावर उठून दिसतात. त्यामुळे कोणतीही लिपस्टिक लावली तरी तुम्ही उठून दिसाल. लिपस्टिक लावायच्या अगोदर ओठांना फाऊंडेशन ची एक लेयर लावून घ्या. कारण त्यावर लिपस्टिक लावली तर ती खूप वेळ टिकते.
३) ब्लश : गालावर थोडं ब्लश केलं तर फीचर्स मध्ये निखार येतो. त्यामुळे मेकअप करताना गालावर थोडं ब्लश करा.
४) डोळे हा चेहऱ्याचा सर्वात महत्वाचा हिस्सा आहे. त्यामुळे डोळ्यावरचा मेकअप जर चांगला केला. तर तुम्ही अजून सुंदर दिसाल. जॉ लाईन ला टोन मॅच होतात. तेच टोन डोळ्यावरही लावा. त्यामुळे तुम्ही अधिक सुंदर दिसाल.