फॅमिली प्लनिंगसाठी हे ‘ वय ‘ योग्य

family-planning

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन टीम – लग्नानंतर काही दिवसानंतर काही जण फॅमिली प्लॅनिंगचा विचार करू लागतात. परंतु यासाठी योग्य वेळ निवडणे खूप महत्त्वाचे असते. सध्या करिअर आणि मनपसंत जोडीदार शोधण्यासाठी अनेक जण वयाच्या ३० नंतर लग्न करतात. वयाच्या ३० वर्षापर्यंत आपण आपल्या करिअरमध्ये सेट होतो. आपल्याला मनपसंत जोडीदारही मिळतो. त्यामुळे याच वयात तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करणे गरजेचे असते.

फॅमिली प्लॅनिंगचे योग्य वय खालीलप्रमाणे 

१) साधारण २५ ते २७ हे वय फॅमिली प्लॅनिंगसाठी योग्य असते. परंतु तुम्ही ३० ते ३२ वयाचे जरी झाले तरी फॅमिली प्लॅनिंग करू शकता. या वयात प्लॅनींग करताना फक्त २ बाळांमधील अंतर जास्त असता कामा नये. असे करणे बाळ आणि आईसाठी घातक असते. त्यामुळे चान्स घेताना काळजी घेणे गरजेचे असते.

२) ज्यांनी वयाची ३० वर्ष पूर्ण केली असतील त्या स्रिया फॅमिली प्लॅनिंग करू शकतात. पण त्यांनी या वयात काळजी घेण्याची गरज आहे. वयाच्या २५ व्या वर्षी तुमची इम्युनिटी आणि शक्ती असते ती या वयात कमी होते. पण योग्य ती काळजी घेतल्यास तुम्ही वयाच्या ३२ व्या वर्षीही आई होऊ शकतात.

३) वयाची ३५ वर्ष पूर्ण केले असतील तर तुम्ही फॅमिली प्लॅनिंगचा शक्यतो विचार करू नका. या वयात शरीरात अनेक बदल होत असतात. त्यामुळे गर्भ राहणे तसेच बाळांतपणासाठी हे वय अनुकूल नसते. त्यामुळे असा चान्स घेणे रिस्क ठरू शकते.

४) ३५ वर्षांनंतर वाढत्या वयासोबत अनेक समस्यांही वाढतात. या वयात जर तुम्ही फॅमिली प्लॅनिंग करत असाल. तर तुम्हाला तुमची जीवनशैली बदलणे गरजेचे ठरते. तुम्ही काय खाता कसे जगता याचा तुमच्या शरिरावर परिणाम होतो. आणि त्याचा परिणाम गर्भधारणेवर होतो. अशा वयात चान्स घेतल्यास जुळी बाळं जन्माला येण्याची शक्यता अधिक असते.

५) वयाच्या ४० व्या वर्षी फॅमिली प्लॅनिंग करणे खूप अवघड आहे. या वयात गर्भधारणेचे प्रमाण खूप कमी असते. आणि या वयात गर्भधारणा करणे म्हणजे आरोग्यासाठी खूप घातक आहे. कारण या वयात जर गार्भधारणा केली तर, हाय ब्लड प्रेशरचा आजार जडू शकतो. त्यामुळे बाळाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या वयात गार्भधारणेचा निर्णय घेताना जरा विचार करा.