‘ही’ पथ्ये पाळा अन् पित्‍ताचा त्रास ‘हमखास’ टाळा !

July 10, 2019

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सध्या कामाचा वाढत असणारा व्याप यामुळे अनेकांना वेळेवर जेवायला वेळ मिळत नाही. आणि वेळेवर पाहिजे तेवढी झोपही घेता येत नाही. त्यामुळे अनेकांना ऍसिडिटीचा त्रास जाणवतो. पित्ताचा त्रास सुरु झाला की आपण ओमीची गोळी घेतो. या गोळीने आपल्याला थोडा वेळ आराम मिळतो. पण काही वेळाने हा त्रास पुन्हा सुरु होतो. त्यामुळे आपण जर पित्त होऊ नये म्हणून पथ्ये पाळली तर आपला त्रास कमी होईल.

१) तुम्हाला जर पित्ताचा जास्त त्रास असेल तर तुम्ही चहा आणि कॉफ़ी पूर्णपणे बंद करा.

२) आपल्याला सारखे पित्त होऊ नये. म्हणून मेथी आणि वांग अजिबात खाऊ नका.

३) ज्या व्यक्तींना पित्ताचा होतो. त्यांनी आपल्या जेवणाची आणि झोपण्याची वेळ फिक्स करा. कारण वेळेवर जेवण केलं नाही. आणि झोप झोप योग्य मिळाली नाही तर पित्ताचा त्रास वाढतो.

४) काहींना सवय असते की एकदाच खूप मोठं खायचं पण असं करू नका. दिवसभरात कमी-कमी ४ वेळा आहार घ्या.

५) जेवण झाल्यानंतर कमीत कमी ३ तासांनी झोपा.

६) मसालेदार पदार्थ शक्यतो कमी प्रमाणात खा.

७) कोणी जर उपवास पकडत असेल तर त्यादिवशी नुसती फळे खा.

८) आंबवलेले पदार्थ ( इडली, उतप्पा ) कमी. डोसा खाऊन पित्त वाढत नाही.त्यामुळे तुम्ही ते खाऊ शकता.