आरोग्यानामा ऑनलाईन टीम : वजन वाढणे ही समस्या सध्या खुपच वाढली आहे. ही समस्या होण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी जवळपास सर्वच कारणे आपल्याला माहिती असतात. परंतु, प्रेमात पडल्यावरही वजन वाढू शकते, हे कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु, हे सत्य आहे. ऑस्ट्रेलियायाच्या सेंट्रल क्वीलँड यूनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, जेव्हा लोक कुणासोबत प्रेमाच्या नात्यात असतात किंवा कुणावर प्रेम करत असतील तेव्हा त्यांचे वजन वाढण्याची शक्यता अधिक असते. यामागे कोणती कारणे असतात, ते जाणून घेवूयात.
ही आहेत कारणे
1 जेव्हा तुम्ही कुणासोबत नात्यात असतात तेव्हा काही महिन्यांनी किंवा वर्षांनी पार्टनरला इम्प्रेस करण्याची भावना संपुष्टात येते. स्वत:वर लक्ष देण्याच्या कारणाने नकळत वजन वाढू लागते.
2 जे लोक प्रेमात असतात ते जीममध्ये जाऊन एक्सरसाइज करण्यापेक्षा जास्त वेळ पार्टनरसोबत घरीच घालवणे पसंत करतात.
3 प्रेमाच्या आनंदामुळे शरीरातील हॅप्पी हार्मोन्स ऑक्सिटोसिन आणि डोपामाइन सक्रिय होतात. यामुळे चॉकलेट, वाइन आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. यामुळे वजन वाढते.
Visit : arogyanama.com