आरोग्यानामा ऑनलाईन टीम : सोरायसिस क्रॉनिक म्हणजे पुन्हापुन्हा होणारा ऑटोइम्यून रोग आहे. यामुळे त्वचेवर लाल आणि पांढऱ्या रंगांचे डाग येतात. हे डाग शक्यतो डोकं, हात-पाय, तळहात, पायांचे तळवे या ठिकाणांवर येतात. हा रोग अनुवंशिक आहे, पण अन्य काही कारणांनीही होऊ शकतो. वातावरणातील बदलानेही तो होतो. तो कुणालाही कधीही होऊ शकतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, बदलते वातावरण ही समस्या वाढवू शकतात.
हे लक्षात ठेवा
१ हा आजार लपविण्यापेक्षा लगेच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करा.
२ गरमीचा आणि याचा काहीही संबंध नाही. तो हिवाळ्यातही होतो. हिवाळ्यात जास्त त्रास होऊ शकतो. त्वचा अधिक कोरडी होऊ शकते.
३ पुरूष, महिलांसह कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो.
४ चेहऱ्यावर येणाऱ्या लाल फुऱ्यांमुळे वेदनाही होतात आणि यांचा आकारही वाढू शकतो.
५ भारतात हा आजार प्रत्येक वर्षी १० मिलियन लोकांपेक्षा अधिक लोकांना होतो.
Visit : arogyanama.com