चिंचेचा ‘हा’ फेसपॅक वापरा आणि चेहऱ्याचे सौंदर्य खुलवा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – चिंच फक्त जेवणाचा स्वाद वाढवत नाही तर आरोग्यासाठी देखील लाभदायक आहे. याशिवाय चिंच सौंदर्यवर्धकही आहे. चेहरा उजळण्यासाठी चिंच उपयुक्त आहे. याविषयी खूप कमी लोकांना माहित आहे.जाणून घेवूयात चिंचेच्या फेसपॅकचा वापर करून चेहऱ्याचे सौंदर्य कसे खुलवायचे.

असा तयार करा चिंचेचा फेसपॅक – चिंचेचा फेसपॅक तयार करण्यासाठी तुम्ही चिंचेमध्ये दही, चंदन किंवा मुलतानी माती मिक्स करू शकता. एक चमचा चिंचेमध्ये दोन चमचे मुलतानी माती, थोडेसे दुध आणि गुलाबपाणी मिक्स करा व त्याचा पॅक बनवा. हा फेसपॅक पूर्ण चेहऱ्याला लावा. मात्र हा फेसपॅक डोळ्याला लावू नका. अर्धा तास चेहऱ्यावर हा मास्क ठेवा त्यांनतर थंड पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा. त्यामुळे तुमची त्वचा सुंदर आणि तरुण तजेलदार दिसेल.

चिंचेचे सौंदर्यवर्धक लाभ – चिंचेमध्ये अ‍ॅन्टी-ऑक्सीडेंट्सव्यतिरिक्त व्हिटॅमिन सी आणि ए असते जे त्वचेला हानिकारक किरणांपासून वाचवतात. चिंच त्वचेसाठी परिपूर्ण ब्लीच म्हणून काम करते आणि त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते. चिंचेमध्ये अल्फा हायड्रोक्साइल ऍसिड असतात जे खोलवर त्वचेत जातात आणि त्वचेतील अशुद्धी बाहेर काढण्यास मदत करतात. याशिवाय चिंच चेहऱ्यांवरचे डाग आणि व्रण घालवून त्वचा नितळ बनवते.