आरोग्यनामा ऑनलाइन टीम – फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप यासारख्या सोशल मीडियावर असंख्य लोक दिवसातील जास्तीत जास्त वेळ घालवतात. सोशल मीडीयाचे सकारात्मक उपयोग भरपूर असले तरी त्याच्या अतिवापरामुळे काही दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. यामुळे अनिद्रा, तणाव, एकटेपणासारख्या समस्या भेडसावतात. सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आरोग्यावर कोणते परिणाम होतात ते जाणून घेवूयात.
हे आहेत दुष्परिणाम
१) आठवणी
अनेकजण खासगी आयुष्यातील फोटो आठवण स्वरूपात साठवतात. काहीजण हे फोटो फेसबुक अथवा इतर सोशल मीडिया साईटवर अपलोड करतात. परंतु यामुळे ते क्षण प्रत्यक्षात अनुभवायचे मात्र राहून जातात. तसेच सोशल मीडियाच्या या अतिवापरामुळे अनेकदा चुकीच्या गोष्टींसाठीही उपयोग केला जातो.
२) आत्मविश्वास
दुसऱ्यांचे अकाउंट पाहून मनात ईर्षा निर्माण होते. इतरांच्या पोस्टची तुलना स्वतःच्या पोस्टशी केली जाते. अशा गोष्टींमुळे स्वतःची तुलनाही इतरांशी केली जाते. त्यामुळे नकळत आत्मविश्वास कमी होतो.
३) सामाजिक संबंध
सोशल मीडियाचा सामाजिक आयुष्यावर परिणाम होत आहे. जास्तीत जास्त वेळ सोशल साईट्सवर घालवल्यामुळे नात्यांमध्ये दूरावा येत आहे.