फेसबुक पोस्टवरून समजणार तुम्ही कोणत्या आजाराशी झगडताय !

facebook
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – युझरच्या फेसबुक प्रोफाइलची तपासणी बघूनच त्याला कोणता आजार झाला आहे हे सांगता येते. आजार किती गंभीर आहे, तो कोणत्या अडचणींना तोंड देत आहे हे सुद्धा समजू शकते. यासाठी युझरचे वय आणि लिंग विचारायची आवश्यकता नसते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. तसेच फेसबुकवर लिहिलेल्या एका पोस्टवरून  निराशा आणि ड्रग्सच्या व्यसनांची प्रकरणे शोधण्यात यश मिळाल्याचेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

हे संशोधन करण्यासाठी अमेरिकेच्या पिट्सबर्ग विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी ९९९ लोकांवर संशोधन करताना त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवरील ९ लाख ४९ हजार ५३० पोस्टमधून २ कोटी शब्दांची निवड केली. या शब्दांच्या आधारावर २१ प्रकारच्या समस्यांना ओळखले. यांमध्ये गर्भधारणा, पोटशी निगडीत आजार, त्वचेचे आजार, अस्वस्थता, लठ्ठपणा आणि ड्रग्स-अल्कोहोलचे व्यसन आदी युजर्स होते. रूग्णाच्या फेसबुक डाटाच्या मदतीने अनेक गोष्टींची खोलवर माहिती मिळते. युजर्सच्या फेसबुक पोस्टमधील कोल्ड्रिंक, बॉटल यांसारखे शब्द अल्कोहोल अ‍ॅडिक्शनकेड इशारा करतात. याशिवाय डम्ब, बुलश**ट यांसारखे शब्द ड्रग्स घेणे आणि मानसिक संतुलन बिघडल्याचे दर्शवत, असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

तसेच युजर्सने पोस्टमध्ये स्टमक, हेड, हर्ट असे शब्द वापरले असतील तर तो मानसिक विकारग्रस्त असल्याचे समजले जाते. गॉड,फॅमिली आणि प्रे यांसारख्या शब्दप्रयोग करणारे युझर्समध्ये डायबिटीजचे लक्षणे असल्याचे संशोधकांना या संशोधनत दिसून आले. फेसबुक पोस्टच्या आधारे शास्त्रज्ञांनी वर्तवलेले अंदाज किती खरे आहेत हे जाणण्यासाठी संशोधनात सहभाग घेतलेल्या व्यक्तींचा वैद्यकिय इतिहास जाणून घेतला असता डायबिटीज आणि अस्वस्थता तसेच मानसिक विकारांचे अंदाज खरे असल्याचे आढळले. फेसबुक पोस्टमधील शब्द आजाराची पूर्ण माहिती देत नाहीत. पण रुग्ण कोणत्या आजाराशी झगडत आहे याचे संकेत देतात. भविष्यात अशाच डेटाच्या मदतीने रोगाला प्रारंभिक पातळीवर थांबविता येऊ शकते, असे संशोधक डॉ. रैना मर्चंट यांनी म्हटले आहे.