• Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
arogyanama.com
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
No Result
View All Result
arogyanama.com
No Result
View All Result

#YogaDay2019 : निरोगी व आकर्षक चेहऱ्यासाठी सर्वोत्तम मार्ग ‘फेस योगा’

Nagesh Suryawanshi by Nagesh Suryawanshi
June 18, 2019
in Yoga Day Special, योग
0
face-yoga

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : चेह-याला निरोगी व आकर्षक करण्यासाठी फेस योगा हा सर्वोत्तम मार्ग आहे. पूर्ण शरीराची काळजी घेताना चेहऱ्याकडे नेहमी दुर्लक्ष होते. यासाठी चेहऱ्याचा व्यायाम करणे खूप आवश्यक आहे. शरीर आतून खराब असेल तर त्याचा त्याचे परिणाम चेह-यावर दिसून येतात. तणाव असल्यास तो चेहऱ्यावरून समजतो. म्हणूनच शरीराच्या इतर योगाप्रमाणेच फेस योगा हा लाभदायक आहे. फेसयोगाने चेहरा निरोगी, आकर्षक दिसतोच, पण यामुळे जीवनातही आत्मविश्वास, उत्साह येतो.फेस योगाचे वेगळेपण म्हणजे हा योगाप्रकार कुठेही करता येतो.

यामध्ये मॅटची गरज नसल्याने अगदी ऑफिसमध्ये देखील तुम्ही फेसयोगा करू शकता. तज्ज्ञ सांगतात, शरीराप्रमाणेच चेहऱ्याला सुदृढ ठेवणे आवश्यक आहे. याबाबत जागृतीही झाली असून अनेकजण चेह-याच्या आरोग्याकडे लक्ष देत आहेत. रोज चेहऱ्याचा योगा १५ ते २० मिनिटे केल्यास फायदेशीर ठरते. फेस योगा चेह-यावरील मांसपेशींना मजबूत करतो. यामुळे त्वचा तजेलदार होते. तणाव, काळजीमुळे चेह-यावर पडणारे काळे डाग, सुरकुत्या निघून जातात. चेहरा हा तणावमुक्त दिसतो.फेस योगा बहुपयोगी आहे. शरीरातदेखील यामुळे फरक पडतो. अनेक आजारांवर उपयोगी पडणारा हा योग आहे.

फेस योगाचे विविध प्रकार असून पहिला प्रकार आहे लाफिंग आऊट-लाऊड फेस. हा करण्यासाठी जमिनीवर सरळ बसावे. हसता हसता दोघा हातांच्या बोटांना हनुवटीच्या खाली ठेवावे. जोर देत गालांवर दाबावे. या अवस्थेत ५ ते १० मिनिटांपर्यंत थांबावे. त्यामुळे गाल प्रफुल्लित दिसतात आणि चेह-यावरील तणाव नाहिसा होतो.तसेच सॅश माऊथ योगा करण्यासाठी आरामाच्या मुद्रेत बसावे. श्वासवर घेत प्रथम उजव्या बाजूचा गाल फुगवावा आणि नंतर डावा गाल फुगवावा. वीस वेळा ही प्रक्रिया करावी. दोघं बाजूने हे करावे. तिसरा फेसयोगा आहे स्मायलिंग फिश फेस. हा करण्यासाठी आराम मुद्रेमध्ये बसून चेहऱ्याला माशाप्रमाणे बनवावे. ओठांना खालील बाजूस ताणावे. नंतर गालांमध्ये ताणासारखे जाणवेल. त्यामुळे गालांमधील सगळ्या मांसपेशी टोन अप होतात. चौथा इनवर्टेड पोज हा फेस योगा आहे. हा करण्यासाठी उभे राहून दोन्ही पायांत अंतर घ्यावे. श्वास खेचत समोरील बाजूस वाकावे. दोन्ही हातातील अंगठा आणि मधले बोट हनुवटीवर ठेवावे. ५ ते १० सेकंदापर्यंत ही प्रक्रिया करावी. यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते. हा दिवसातून दहा वेळेस करावा.

Tags: 'फेस योगा'arogyanamaAttractiveface yogahealthHealthyआकर्षकआरोग्यआरोग्यनामानिरोगी
  • About
  • Shop
  • Forum
  • Contact

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग

© 2021