आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोणताही आजार होण्यापूर्वी त्याचे संकेत शरीर देत असते. हे संकेत ओळखता आले तर वेळीच उपचार केल्याने आजार बरा होऊ शकतो. आजारांचे हे संकेत शरीराच्या विविध भागावर दिसून येत असतात. काही आजारांचे संकेत हे आपल्या चेहऱ्यावर दिसून येतात. चेहऱ्यामध्ये होणारे हे सात बदल कोणते याबाबत माहिती घेवूयात.
हे आहेत बदल
चमकदार डाग येणे
चेहऱ्यावर चमकदार डाग येणे हा कुष्ठ होगाचा संकेत असतो. ही समस्या खुप गंभीर असल्याने ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
दिर्घकाळ पिंपल्स
पिंपल्स असणे हा पोटासंबंधीत आजार किंवा हार्मोन्स इम्बॅलेन्सचा संकेत असतो. ही समस्या वाढवल्यावर तात्काळ डॉक्टरांकडे जावे.
पिवळेपणा येणे
चेहरा आणि डोळे पिवळे होणे हा एनीमिया, लिव्हर डिसिज किंवा काविळचा संकेत आहे. पायाच्या स्किनवर सुद्धा पिवळेपणा येतो.
चेहऱ्यावर सूज
चेहऱ्यावर सूज एंजियोएडिमा, हायपोथारायडिजम, एनीमिया, किडनी डिसिज किंवा औषधांच्या साइड इफेक्टचा संकेत असतो. यामध्ये गाल, डोळे आणि ओठांजवळ सूज येते.
पांढरे डाग
चेहऱ्यावर पांढरे डाग हे कॅल्शियमची कमतरता, आयर्नची कमतरता आणि पोटात जंत होण्याचा संकेत आहे.
दाढीचे केस गळणे
दाढीचे केस गळणे हे एनीमिया आणि हायपोथारॉइडज्मचा संकेत आहे.
पुरळ
चेहऱ्यावर पाण्याचे पुरळ येणे चिकनपोक्सचा संकेत आहे. यामध्ये व्यक्तीला ताप येतो.