ऑनलाइन टीम – Face Glow | आजकाल लोक चेहर्यावर ग्लो आणण्यासाठी आणि मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी महागड्या स्किन केअर प्रोडक्ट्स (Skin Care Product) चा वापर करतात, परंतु त्यातील बहुतेक केमिकल्स असतात आणि ते त्वचेचा फायदा करण्याऐवजी नुकसान करतात (Face Glow). चेहर्यावर नैसर्गिक चमक आणण्यासाठी आणि मुरुम-फुटकुळ्या दूर करण्यासाठी रात्री मोहरीचे तेल (Mustard Oil) लावणे सर्वात फायदेशीर आहे (Mustard Oil on Face Benefits).
रात्री चेहर्यावर मोहरीचे तेल लावण्याचे 5 फायदे
1. ड्राय स्कीनमुळे होईल सुटका :
प्राचीन काळापासून मोहरीचे तेल त्वचेला मॉइश्चरायझ करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. हे त्वचेची आर्द्रता बंद करून पोषण प्रदान करते आणि कोरड्या त्वचेची समस्या (Dry Skin) दूर करते.
2. मुरुम-फुटकुळ्या होतील दूर :
मोहरीच्या तेलात अँटीऑक्सिडंट्स आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात. यामुळे, ते चेहर्यावरील हानिकारक बॅक्टेरियाशी लढण्यास आणि काढून टाकण्यास मदत करते. मोहरीचे तेल मुरुम-फुटकुळ्या बरे करते तसेच त्वचेच्या जखमा लवकर भरून काढते. (Face Glow)
3. त्वचेवर आणते चमक :
रात्री झोपण्यापूर्वी चेहर्यावर मोहरीचे तेल लावल्याने चेहर्याच्या त्वचेचा रंग सुधारतो. मोहरीचे तेल चेहर्यावरील टॅनिंग, पिगमेंटेशन, डाग कमी करण्यास देखील मदत करते. यामुळे चेहर्यावर चमक येते.
4. त्वचा करते घट्ट :
चेहर्यावर मोहरीचे तेल लावल्याने तुम्ही दीर्घकाळ तरुण दिसू शकता. मोहरीचे तेल चेहर्याची त्वचा घट्ट करते, ज्यामुळे बारीक रेषा, सुरकुत्या आणि छिद्र श्रिंक होतात. यामुळे चेहरा तरुण दिसतो.
5. डेड स्कीन करते स्वच्छ :
मोहरीच्या तेलामध्ये अँटिऑक्सिडंट असतात आणि त्यामुळे ते फ्री रॅडिकल्सशी लढण्यासोबतच मृत त्वचा स्वच्छ करण्यास मदत करते.
मोहरीचे तेल त्वचेसाठी नैसर्गिक एक्सफोलिएटर म्हणून काम करते.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Face Glow | mustard oil benefits on face overnight
Male Fertility | ‘हे’ 4 फूड्स खाल्ल्याने वाढेल Sperm Count, पूर्ण होईल पिता बनण्याची इच्छा
High Uric Acid च्या रूग्णांनी कधीही करू नयेत ‘या’ 5 चूका, अन्यथा वाढू शकतो त्रास
Weight Loss Mistakes | जेवणात कधीही करू नका या चूका, अन्यथा वजन कमी करण्याची इच्छा राहील अपूर्ण