लहान मुलं झोपेत लघवी करत असतील तर करा ‘हे’ ४ उपाय

urge

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – काही लहान मुलं ही रात्री झोपेत लघवी करतात. आणि त्यांची झोपेत लघवी करण्याची सवय जर जास्त असेल तर ते आपल्याला नको वाटतं . आणि काही मोठी मुलंही झोपेत लघवी करतात. त्यांची ही सवय त्यांना सकाळी उठल्यावर लाजिरवाणी वाटत असते. आणि पालकही त्यांच्यावर ओरडत असतात. पण ही गोष्ट खूप सामान्य असते. मुलांची वाढ होत असताना असे होत असते खूप गंभीरपणे घ्यायची गोष्ट नाही. परंतु , हे होऊ नये म्हणून नेमके काय उपाय करता येतील ते जाणून घ्या.

१) रात्री झोपण्या अगोदर मुलांना सोबत घेऊन त्याला लघवी करायला लावा. आणि त्याला सांगा की, रात्री तुला जर लघवी लागलीच तर मला उठव असे त्याला सांगा. जेणेकरून त्याला तशी सवय लागेल. आणि हळूहळू तुमच्या मुलाची रात्री लघवी करण्याची समस्या दूर होईल.

२) रात्री झोपण्याच्या अगोदर तुमच्या मुलाच्या अंगाखाली पाणी शोषून घेणारे शीट टाकून द्या. म्हणजे तुमचा त्रास कमी होईल आणि त्या मुलालाही इन्फेक्शनही होत नाही.

३) जर एखादेवेळी तुमची मुलं जर अंथरुणात लघवी करत असेल तर त्याबद्धल त्याला हसू नका. किंवा छळ करू नका. कारण त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होईल. आणि त्याचा दृष्टिकोन हा कमकुवत राहील ठाम होणार नाही.

४) अंथरून ओले करणे सामान्य गोष्ट आहे. तुम्ही याबाबत खूप चर्चा व गंभीरपणे बोलत राहिलात तर मुलांना लाजिरवाणी वाटेल आणि ते त्या गोष्टी मनात ठेवून त्यांना चुकल्या- चुकल्या सारखे वाटेल. त्यामुळे त्यांना काही बोलू नका.