आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आपण आपल्या डोळ्यांची चांगली काळजी घेत नाहीत. डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे डोळ्यांचे अनेक आजार उद्भवू शकतात. घरगुती उपचारांद्वारेही डोळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देता येते. संगणकाचा वापर वाढल्यामुळे तरुण पिढीमध्ये डोळ्यांचे विकार वाढू लागले आहेत. आपण कामानिमित्त नेहमी बाहेर फिरत असतो. त्यामुळे आपल्या डोळ्यांना उन्हाचा, प्रदूषणाचा त्रास होत असतो. यापासून आपण आपल्या डोळ्यांचा बचाव करणे गरजेचे आहे.
१) उन्हाळ्यात बाहेर पडताना डोळ्यांना गॉगल लावावा. अंघोळ करताना अतिगरम पाणी वापरू नका. मनावरचा ताण वाढला, वारंवार संतापू लागलात, तर त्याचाही विपरीत परिणाम डोळ्यांवर होत असतो.
२) डोळ्यांभोवतीचा भाग चोळू नका. त्यामुळे डोळ्यांना हानी पोहोचू शकते. झोपण्यापूर्वी कॉफी, दारू पिऊ नका. कॉफी प्यायल्याने रात्री शांत झोप लागत नाही.
३) डोळ्यांच्या आरोग्यासाठी शांत झोप मिळणे अत्यंत गरजेचे असते. त्रिफळाच्या सहाय्याने दररोज डोळे धुणे हा चांगला उपाय आहे.
४) सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना शुद्ध गायीच्या तुपाचे एक-दोन थेंब नाकात सोडा. या उपचारामुळे आपली दृष्टी चांगली राहण्यास मदत होते.
५) डोळ्यांचे आरोग्य बिघडण्यास आहारात मिठाचे प्रमाण अधिक असणे, नियमित मद्य सेवन करणे, अतिगोड पदार्थ खाणे, उडदापासून बनवलेल्या पदार्थांचे अतिसेवन करणे, यामुळे डोळ्यांचे कार्य व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य राखायचे असेल तर हे पदार्थ टाळा.