पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन- जागतिकीकरणाच्या युगामध्ये मोबाईल आणि कंप्युटर हे आपल्या जीवनात अतिमहत्त्वाचे झाले आहेत. तरुण पिढी तासन तास मोबाईलकडे एकटक पाहत असते. तर कंपनीमध्ये अनेक संस्थांमध्ये काम करणारे कामगार १२-१२ तास एकटक कंप्युटरकडे पाहत असतात. त्यामुळे त्यांच्या डोळ्यावर खूप ताण येतो. आणि डोळयांच्या समस्या वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. पण मोबाईल आणि कंप्युटर प्रमाणेच डोळे ही आपल्या शरीराचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे डोळ्यांचीही काळजी घेणे आवश्यक आहे.
* डोळ्यांची काळजी कशी घ्यावी ते पुढीलप्रमाणे *
१) मोबाईलचा आणि कंम्प्युटरचा वापर करताना स्क्रीनच्या जास्त जवळ बसू नये.
२) स्क्रीनचा प्रकाश डोळ्यांना हानी पोहचवणार नाही. याची काळजी घ्यावी.
३) जास्त वेळ जर कंप्युटरसमोर बसून काम करत असाल. तर मध्ये थोडी विश्रांती घ्या. थोडा वेळ डोळे बंद करून बसा.
४) काम करत असताना जास्त वेळा डोळ्यांची उघडझाप करावी. त्यामुळे डोळ्यांना आराम मिळेल.
५) डोळ्यांना जर कोरडेपणा येत असेल तर डॉक्टरांना दाखवा.
६) जास्त वेळ एसी समोर बसू नये.
७) टीव्ही पाहत असतानाही आपले अंतर टीव्हीपासून ३ मीटर लांब ठेवावे. जनेकरून डोळ्यांना कोरडेपणा येणार नाही.
८) अंधारात मोबाईल, कंप्युटर आणि टीव्ही समोर बसू नये.