आरोग्यनामा ऑनलाईन टीम – डोळे लाल होणे ही समस्या सामान्य वाटत असली तरी तिच्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. कारण राग, रडणे, जागरण, रांजणवडी येणे, यामुळेच डोळे लाल होतात, असे नाही. यामागे गंभीर कारण सुद्धा असू शकते. वारंवार डोळे लाल होत असल्यास तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करू घ्या. डोळे लाल होण्यामागे कोणती कारणे असू शकतात, याविषयी माहिती घेवूयात.
मोनोपॉज
मोनोपॉजच्या वयात महिलांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्समुळे डोळे कोरडे आणि लाल होऊ शकतात.
कंजक्टिवायटिस
व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे कंजक्टिवायटिस म्हणजेच डोळे येतात. यामुळे डोळे लाल होऊ शकतात.
अॅलर्जी
घाण, धूर, पाळीव प्राणी, शाम्पू, स्विमिंग पूलच्या पाण्यातील क्लोरीन यामुळे डोळे लाल होऊ शकतात.
औषधी
झोपेच्या गोळ्या, पेन किलर्स, नैराश्य दूर करणारे औषध किंवा अँटी अॅलर्जिक मेडिसिन्समुळे डोळे लाल होऊ शकतात.
काँटॅक्ट लेन्सेस
वारंवार काँटॅक्ट लेन्स लावणे आणि काढणे यामुळे डोळ्यात इरिटेशन, कोरडेपणा आणि लालसरपणा येऊ शकतो.
कॉर्नियल अल्सर
डोळ्यांच्या मधोमध लहान गोल आकाराला कॉर्निया म्हणतात. यावर एखादी जखम झाल्यास डोळे लाल होऊ शकतात.
ग्लुकोमा
या आजारात डोळ्यांवरील ताण वाढतो. यामुळे डोळे लाल होऊ शकतात.
आयरायटिस
डोळ्यांमध्ये कॉर्नियाच्या मागे आयरिस असतो. यामध्ये सूज येण्याला आयरायटिस म्हणतात. यामुळे डोळे लाल होऊ शकतात.
स्क्लेरायटिस
या आजारात डोळे लाल होऊ शकतात. आर्थरायटिस, टीबीसारख्या पेशंटमध्ये हे संकेत जास्त असतात.