आरोग्यासंदर्भातील ‘या’ महत्वाच्या ११ प्रश्‍नांची उत्‍तरे आवश्य जाणून घ्या !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आरोग्यासदंर्भात अनेक प्रश्न आपल्या मनात असतात. परंतु या प्रश्नांची उत्तरे कधीही समजत नाही. कोणता आहार चांगला, कोणता वाईट याबाबतही आपल्याला योग्य माहिती मिळत नाही. आरोग्यासंदर्भातील लोकांच्या मनातील अशाच महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आपण प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात जाणून घेणार आहोत.

प्रश्न : गर्भवती महिलांनी स्वीमींग करणे आरोग्यासाठी धोकादायक आहे का?
उत्तर : गर्भवती महिलांनी स्वीमींग करणे चांगले आहे. मात्र, पाणी स्वच्छ असायला हवे. सार्वजनिक  ठिकाणी स्वीमींग करू नये.

प्रश्न : जेवण केल्यानंतर फळे खावीत का?
उत्तर : फळे कधीही खावीत. मात्र उपाशीपोटी फळे खाल्ल्यास कॉल्शियमचा जास्त लाभ होत नाही.

प्रश्न : तणाव कमी करण्यासाठी काय खावे?
उत्तर : तणाव कमी करण्यासाठी केळी, खरबुज, अननस या फळाचा वापर आहारात करावा.

प्रश्न : एनर्जी ड्रिंक्समुळे शरीराला खरंच ऊर्जा मिळते का?
उत्तर : यावर संशोधन झालेले नसून यामुळे काही वेळेसाठी शरीराला उर्जा मिळते. मात्र याच्या अतिसेवनामुळे शरीरातील शुगरचे प्रमाण वाढते.

प्रश्न : वयाच्या ३५ वर्षानंतर कॅल्शियमचे प्रमाण वाढवण्यासाठी दूध प्यावे का?
उत्तर : २० ते २५ वर्षापर्यंत शरीरात बोन मांस तयार होते. यामुळे या वयातच कॅल्शियम, व्हीटामीन्स डी असलेले पदार्थ घ्यावेत.

प्रश्न : साखर खाल्ल्यामुळे लहान मुले हायपर होतात का?
उत्तर : हे चूकीचे आहे. साखर खाल्ल्यामुळेअटेंशन डेफिसिट डिसऑर्डर होऊ शकतात. लहान मुलांना जास्त साखर देऊ नये.

प्रश्न : सोन्याच्या किंवा चांदीच्या ताटात जेवण करणे आरोग्यासाठी चांगले आहे का?
उत्तर : याबाबत संशोधन झालेले नाही. मात्र ट्रेडीशनल अल्टरनेटीव्ह मेडीसीन सिस्टमनुसार सोन्याच्या किंवा चांदीच्या ताटात जेवण करणे चांगले असते.

प्रश्न : प्रक्रिया केलेले चीज आरोग्यासाठी हानीकारक आहे का?
उत्तर : चीजमध्ये प्रोटीन्स, कॅल्शियम असल्यामुळे चीज आहारात घेणे लाभदायक ठरते. मात्र चीज विकत घेताना लेबल पाहून घ्यावे.

प्रश्न : मायक्रोवेविंगसाठी सर्वात चांगले मटेरियल  कोणते?
उत्तर : मायक्रोवेवसाठी सिरॅमिक कंटेनरचा कंटेनरचा वापर करावा.

प्रश्न : एयर फ्रेशनरचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो का?
उत्तर : एयर फ्रेशनर तयार करण्यासाठी थॅलेट्सचा वापर केल्याने ते आरोग्यासाठी हानीकारक ठरते. जास्त वापर केल्यास हार्मोनल डिसऑर्डर आजार होऊ शकतो.

प्रश्न : आयोडीनसाठी मीठ सोडले तर दुसरा पर्याय आहे का?
उत्तर : नाही. समुद्रातील फळामध्ये आयोडीन असते. मात्र ही फळे उपलब्ध होत नाहीत.