मणक्याच्या दुखापतीमुळे पक्षाघात झालेले रुग्ण पुन्हा उभे राहू शकतात ; जाणून घ्या

मणक्याच्या दुखापतीमुळे पक्षाघात झालेले रुग्ण पुन्हा उभे राहू शकतात ; जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन – पाठीच्या मणक्याला दुखापत झाल्याने अनेक रूग्ण हालचाल करू शकत नाहीत. काहींना तर आयुष्यभर व्हिलचेअरचा वापर करावा लागतो. शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून यावर संशोधन करत असून आता यावर मार्ग निघण्याची शक्यता आहे. युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गच्या शास्त्रज्ञांनी झेब्राफिश या माशावर हे संशोधन केले आहे.

हे आहे संशोधन

उष्ण कटिबंधातील गोड्या पाण्यात राहाणारा झेब्राफिश हा मासा अतिशय विलक्षण असून या माशाच्या पाठीच्या मणक्याला दुखापत झाली, तरीही त्याच्यात अशी क्षमता आहे की ही दुखापत तो स्वत:हून काही आठवड्यात बरी करू शकतो.

पाठीच्या मणक्याला दुखापत झाल्यास झेब्राफिशमधील फायब्रोब्लास्टस नावाच्या पेशी ही दुखापत बरी करण्यासाठी सरसावतात. इजा झालेल्या भागात या पेशी तयार होतात.

या फ्रायब्रोब्लास्टस पेशी कोलॅजेन १२ नावाचे मॉल्यूक्युल्स तयार करतात. मज्जातंतूची रचना हे मॉल्यूक्युल्स बदलतात.

यामुळे दुखापतग्रस्त भागातील मज्जातंतू पुन्हा पुनरुज्जिवित होतात आणि शरीरातील संपर्क पुन्हा साधतात.

Visit : Arogyanama.com 

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु