तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे

तुळशीची पाने किडनी स्टोनवर गुणकारी, जाणून घ्या असेच ९ फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अलिकडे दारात तुळस लावण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी, आजही असंख्य लोकांच्या दारात, बाल्कनीत तुळस आवर्जून लावली जाते. तुळशीचे धार्मिक महत्त्व आणि औषधी गुणधर्म सर्वांनाच माहित आहेत. परंतु, तुळस ही किडनी स्टोनवर गुणकारी असल्याचे फारच थोड्या लोकांना माहित आहे. तुळशीच्या पानांचे औषध नियमित घेतल्यास किडनी स्टोनच्या त्रासातून मुक्त होणे शक्य आहे. तुळशीच्या पानांचे किडनी स्टोनसह अन्य आजारांवर असलेले उपाय आपण जाणून घेणार आहोत.

हे आहेत उपाय
किडनी
किडनी स्टोनच्या त्रासातुन मुक्त होण्यासाठी तुळशीची पाने उकळुन त्याचा काढा तयार करा. हा काढा मधासोबत १ महिना नियमित सेवन केल्यास स्टोन मुत्राच्या मार्गाने बाहेर निघुन जाईल.

सुंदर चेहरा
तुळशीची दहा ताजी पाने घेऊन त्याचा रस काढा. तो रस कच्च्या दुधात मिसळा. दुधाऐवजी एक चमचा मिल्क पावडरही वापरू शकता. हा फेसपॅक २५ मिनिटे लावा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या. त्वचेचा रंग उजळतो. आठवड्यातून दोन वेळा हा फेसपॅक लावा.

पिंपल्स
तुळस आणि कडुलिंबात अँटिबॅक्टेरिअल तत्त्व असून त्यामुळे रक्त स्वच्छ होते. तारुण्यपीटिकाही दूर होतात. तुळशीची १० अणि कडूलिंबाची ८ पाने घेऊन त्याची पेस्ट तयार करा. त्यात तीन चमचे गुलाबजल आणि अर्धा चमचा चंदन पावडर टाका. हे मिश्रण लावा आणि २० मिनिटांनंतर चेहरा धुऊन टाका.

हृदय रोग
हृदय रोगांसाठी तुळस लाभदायक आहे. यामुळे रक्तांतील कोलेस्टेरॉल नियंत्रित होते. नियमित तुळशीचा रस सेवन करावा. तुळस आणि हळदीच्या पाण्याचे सेवन करावे.

पाणी स्वच्छ होते
पाणी शुध्द करण्यासाठी पाण्याच्या भांड्यात तुळशीची पाने टाकावीत. ही पाने किमान सव्वा तास ठेवावीत. यानंतर कपड्याने पाणी गाळुन घ्यावे.

संक्रमण
यातील थाइमोल तत्त्वामुळे त्वचा रोगात आराम मिळतो. तुळशीच्या पानांना त्वचेवर बारीक करुन लावल्यास कोणत्याही प्रकारे संक्रमण होत नाही.

फ्लू रोग
फ्लू रोगामध्ये तुळशीच्या पानांचा काढा, काळे मीठ टाकून प्यावे. फ्लूच्या दरम्यान तापानेग्रस्त असल्यास तुळशी आणि काळ्या मीठाचा सल्ला देतात.

थकवा
तुळशीमुळे थकवा दूर होतो. जास्त थकवा जाणवल्यास तुळशीची पाने आणि मंजुळांचे सेवन करावे.

मायग्रेन
तुळशीच्या नियमित सेवनाने क्रोनिक-मायग्रेन दूर होते. रोज दिवसातुन ४-५ वेळा ६-८ पाने चावून खावीत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु