दहा मिनिटे व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात ठेवा

वजन
आरोग्यनामा ऑनलाइन – वजन कमी करण्यासाठी कार्डिओ वर्कआउटचं करावी. ही एक्सरसाइज केवळ फॅट बर्न किंवा वेट लॉससाठी नसून यामुळे आपण निरोगी राहतो. हृदयही निरोगी राहतं. मात्र, वजन कमी करण्यासाठी सुरू केलेली कोणतीही एक्सरसाइज किंवा डाएट मधेच सोडू नये.  कार्डिओ वर्कआउट शरीरातील कॅलरी बर्न करते. कार्डिओमुळे हृदयासह शरीरातील रक्तप्रवाह चांगला होतो. यामुळं आरोग्य चांगलं राहतं. आठवड्यातून ५ दिवस रोज १५ ते २० मिनिटे कार्डिओ एक्सरसाइज केल्यास भरपूर फायदा होतो. यामुळं वजनही कमी होऊन आपण आतून-बाहेरून फिट होतो.
जंपिंग जॅक हा वर्कआउट अधिक सोपा आहे. हा वर्कआउट कुठेही करता येतो. यासाठी मशीनची आवश्यकता नसते. हा वर्कआउट करताना सरळ उभे रहा आणि जागेवर हात वरखाली करत उड्या मारा. ही एक्सरसाइज तुम्ही ३ ते ५ मिनिटे करा. नंतर याचा कालावधी एक-एक मिनिटाने वाढवा. रोज १० ते १५ मिनिटे हा वर्कआउट करा. जंपिंग जॅक ही एक एरोबिक कार्डिओ एक्सरसाइज असून याने वेगाने वजन कमी होतं. १० मिनिटे जंपिंग जॅक एक्सरसाइज केल्याने १०० कॅलरी बर्न होतात. एका आठवड्यात ७०० कॅलरी बर्न होतात. या एक्सरसाइजमुळे वजनही कमी करून शरीरही फिट ठेवता येतात. एका ठरलेल्या कालावधी पेक्षा जास्त कोणतीही एक्सरसाइज करू नये. असं केल्यास नुकसान होऊ शकते. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्यावा.