आरोग्यनामा ऑनलाईन टीम – लठ्ठपणा ही जगातली मोठी समस्या होऊ लागली आहे. सध्या सर्वच वयोगटातील व्यक्तींना ही समस्या भेडसावत आहे. तंदुरुस्त आणि निरोगी राहाण्यासाठी शरीरातील चरबीचे प्रमाण कमी केले पाहिजे. महिलांमध्ये सर्वात जास्त फॅट्स कंबरेच्या भागामध्ये असते. यामुळे कंबर मोठी दिसते. कंबरेतील चरबी कमी करण्यासाठी खालील उपाय नियमित केले तर चरबी लवकर कमी होते.
हे व्यायाम करा
*जमीनवर सरळ झोपा. हात जमीनीवर सरळ ठेवा. नंतर गुडघ्यापासून पाय दुमडून गुडघे पोटाला चिकटवा. थोडा वेळ या आवस्थेमध्ये थांबून पाय वर उचला. नंतर परत पाय सरळ करा व जमिनीवर ठेवा. हा प्रयोग दहा वेळा केल्यानंतर चरबी कमी होते. यास ‘रिव्हर्स क्रंचेज’ म्हणतात.
*पाठीच्या भागाकडून जमिनीवर झोपा. दोन्ही हात डोक्याच्या पाठीमागे ठेवा. आता शरिराचा वरचा भाग उजव्या बाजूला घ्या. डावा पाय वर उचला. शरीराच्या मधोमध हे दोन्ही भाग एकमेकाजवळ घ्या. ही क्रिया परत-परत करा. एका वेळेला कमीतकमी दहा वेळेस हा प्रयोग करा. यास ‘सायकल क्रंचेज’ म्हणतात.
*जमिनीवर सरळ झोपा. पाय गुडघ्यामधून दूमडा. डाव्या बाजूला शरीर झुकवा. थोडावेळ या अवस्थेत थांबा. दुसरीकडे परत ही प्रक्रिया करा. यावेळी हिप ट्विस्ट होते. हा प्रयोग कमीत-कमी दहा वेळा केल्यानंतर चरबी कमी होते. यास ‘हिप रोलर’ असे म्हणतात.