स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे होतात ‘हे’ घातक परिणाम
आरोग्यनाम ऑनलाईन-स्मार्टफोनचा वापर अलिकडे मोठ्याप्रमाणात वाढला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच हातात मोबाईल फोन दिसतात. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे झोप, सेल्फ स्टीम, रिलेशनशिप, स्मरणशक्ती, अलर्टनेस, क्रिएटिव्हीटी, प्रॉडक्टिव्हिटी, निर्णय क्षमता यावर परिणाम होऊ लागला आहे. तसेच स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे आयुष्य कमी होत आहे.
स्मार्टफोनमुळे शरीराचा स्टेस वाढवणारा कॉर्टिसोल हार्मोन्सचे प्रमाण वाढत आहे. कॉर्टिसोल आरोग्यासाठी हानिकारक असून त्याच्यामुळे व्यक्तीचे आयुष्यही कमी होत आहे. फोनच्या जास्त वापराचे केंद्र डोपामीन हे आहे. हे केमिकल सवयी लावणे आणि सवयी वाढवणे यासाठी असते. डोपामाइनमुळे आपण फोनच्या आहारी जातो. यामुळे स्टेस हार्मोन कॉर्टिसोलचे प्रमाण वाढणे घातक आहे.
कॉर्टिसोल हार्मोन शरीरात अचानक झालेल्या एखाद्या प्रक्रियेपासून आपला बचाव करते. ब्लड प्रेशर, हार्ट रेट किंवा ब्लड शुगर वाढल्यास तणावाच्या स्थितीतही शरीर कॉर्टिसोल रिलीज करते. लागोपाठ कॉर्टिसोलचे प्रमाण वाढते आणि कॉर्टिसोलचे प्रमाण वाढत राहिल्याने डिप्रेशन, जाडेपणा, मेटाबॉलिक सिंडोम, टाइप २ डायबिटीज, फर्टिलिटी समस्या, हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, डिमेंशिया आणि स्ट्रोकसारक्या समस्या होऊ शकतात.