आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मानेत दुखणे आणि कंबर दुखणे हा त्रास आता जवळपास प्रत्येकाला जाणवत आहे. आजच्या युवकांमध्ये हा त्रास तर जास्त प्रमाणात जाणवत आहे. यामागील कारणे आणि त्रास कमी होण्याच्या उपायाबद्दल जाणून घेऊ
गुडघ्यांमध्ये जास्त प्रमाणात दुखणे असेल तर हा त्रास आर्थराइटिसमुळेही होऊ शकतो किंवा आधी कधी गुडघ्यात मार लागला असेल तर या प्रकारचा त्रास होऊ शकतो.
लहान वयात कंबर, मान दुखणे याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कॉम्प्युटर समोर बसणे, बसताना योग्य स्थितीत न बसणे अशा स्थितीतच काही लोक टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर वर तासन तास बसलेले असतात. यामुळेही असे त्रास होऊ शकतात. नेहमी योग्य स्थितीत बसा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. काही तासाने उठून काही अंतर चाला .यामुळे शरीराला थोडी विश्रांती मिळते. तसेच मानेचे काही व्यायाम केल्यानेही मानेचे दुखणे कमी होते.
तसेच तुम्ही नियमित धूम्रपान, दारू पित असाल तर ते टाळा. यामुळेही तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते. व्यसनापासून दूर राहा. जमेल तेव्हा मानेचे, हाताचे आणि कंबरेचे व्यायाम करा. रात्री झोपण्याच्या आधी ३० मिनिटे चाला . यामुळे संपूर्ण शरीराची हालचाल होते. पौष्टिक अन्न पदार्थांचा सेवन करा. यामुळेही अशा आजारांवर चांगला फायदा मिळतो.