आरोग्यानामा ऑनलाईन टीम : पूर्ण आणि शांत झोप मिळाली नाही तर त्याचे परिणाम शरीर आणि मनावर होतात. तसेच याकडे दुर्लक्ष केल्यास याचे गंभीर परिणाम सुद्धा होऊ शकतात. यावरून झोपेचे महत्त्व समजते. परंतु, झोप नक्की किती तासांची घ्यावी, याबाबत नेहमीच वेगवेगळी मते दिसून येतात. परंतु, यासंदर्भात शास्त्रज्ञांनी केलेल्या एका संशोधनानंतर काही ठोस माहिती दिली आहे. द सेंटर फॉर डिसिज कंटड्ढोल अॅण्ड प्रिव्हेन्शन (सीडीसी) या संस्थेने या संदर्भात व्यापक अभ्यास केला आहे.
कमी आणि जास्त झोपेचे दुष्परिणाम
१ हृदयविकार बळावतो.
२ हार्ट अॅटॅक येण्याची शक्यता वाढते.
३ डायबेटिस शक्यता वाढते.
४ लठ्ठपणा वाढू शकतो.
५ मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात.
हे लक्षात ठेवा
* कमी झोप घेणे आरोग्यासाठी वाईट आहे.
* जास्त झोपसुद्धा आरोग्यासाठी वाईटच आहे.
* रोज सात ते नऊ तास झोप घेतली पाहिजे.
* सात ते नऊ तासापेक्षा फार कमी अथवा जास्त झोप घेवू नये.
* कमी आणि जास्त झोपेच परिणाम जवळपास सारखेच.
* कमी झोपेच्या दुष्परिणामांची तीव्रता जास्त आहे.
Visit : arogyanama.com