आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कॉफी उत्साहवर्धक आणि उर्जावर्धक पेय आहे. याच्या सेवनाने शरीरात उर्जा निर्माण होते. अनेकांना नियमित कॉफी पिण्याची सवय असते. योग्य प्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास तिचे अनेक आश्चर्यकारक फायदे दिसून येतात. यातील कॅफिन हे आरोग्यासाठी घातक असल्याचे सांगितले जात असले तरी नव्या संशोधनानुसार ग्रीन कॉफीतील क्लोरोजेनिक अॅसिडमुळे मेटॅबॉलिज्म सुरळीत होते. तसेच वजन कमी होते.
हे फायदे आहेत
१) ग्रीन कॉफीमुळे शरीरात गाठी तयार होत नाहीत. यामुळे कॅन्सरसारखा आजार दूर राहू शकतो.
२) यातील अँटी ऑक्सिडंटमुळे तणाव, डिप्रेशन असे मानसिक आजार दूर राहतात.
३) ग्रीन कॉफी भूक कमी लागते. यामुळे वजन कमी होते. ही ग्रीन कॉफी ऑनलाईन उपलब्ध आहे.
४) यामुळे शुगर नियंत्रणात राहते. याचे नियमित सेवन केल्यास मधुमेह बरा होऊ शकतो, असा दावा काही तज्ज्ञ करतात.