आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आपल्या शरीरात होणारे काही बदल आपण प्रत्यक्ष पहातो, पण त्यामागील कारणे आपल्याला कधीच समजत नाहीत. हे बदल म्हणजे एक प्रकारचे रहस्यच असते. श्वास घेणे, जेवणे, अशी अनेक सामान्य कामे आपण नेहमीच करत असतो. मात्र काही वेळा आपले शरीर असे काही करते की, त्यामागील कारणे आपल्यालाही कळत नाहीत. अशाच रहस्यमय बदलांची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
त्वचा आकसणे
जास्त वेळ पाण्यात राहिल्यास त्वचा आकसते. बोटांची त्वचा ओबडधोबड झालेली दिसते. याचे कारण म्हणजे पाण्यामध्ये इतर वस्तूंवरील पकड मजबूत राहावी म्हणून त्वचा अशी होते.
डोळ्यात पाणी
डोळ्यात पाणी येणे ही डोळ्यांना साफ ठेवण्याची नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे डोळ्यातील ओलावा टीकून राहतो. नजरेत कोणतीही अडचण येत नाही.
शिंक
शरीरात धुळ, कचरा किंवा बाहेरील काहीही श्वसनाद्वारे गेल्यास शिंक येते. या प्रक्रियेद्वारे शरीर अशा गोष्टी थेट बाहेर फेकल्या जातात.
जाभंई
कंटाळा आला की जाभंई येते, असा आपला समज असतो. मात्र, डोक्याचे तापमान कमी करण्यासाठी जांभई येते, असे संशोधनात आढळून आले आहे.