• Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • लाईफ स्टाईल
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट
    • सौंदर्य
  • योग
Arogyanama
No Result
View All Result
No Result
View All Result
Arogyanama
No Result
View All Result
Home तज्ज्ञांचं मार्गदर्शन

एंडोमेट्रीयल हायपरप्लासियाचा ‘अर्थ’, ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ ! जाणून घ्या

by VaradaAdmin
September 10, 2020
in तज्ज्ञांचं मार्गदर्शन
0
एंडोमेट्रीयल हायपरप्लासियाचा ‘अर्थ’, ‘लक्षणं’, ‘कारणं’ अन् ‘उपाय’ ! जाणून घ्या
1
VIEWS

काय आहे एंडोमेट्रीयल हायपरप्लासिया ?

गर्भाशय हे 3 थरांचं बनलेलं असतं. ते म्हणजे पेरिमेट्रीयम, मायोमेट्रीयम आणि एंडोमेट्रीयम. यापैकी एंडमेट्रीयम हा सर्वात आतील थर असतो. हा थर लहान इपीथिलीयल पेशींनी बनलेला असतो. अंडाशयानं सोडलेल्या हार्मोन अंतर्गत याची वाढ होते. हा एंडोमेट्रीयम आहे जो प्रत्येक मासिक पाळीच्या वेळी वाढतो आणि गळून पडतो. त्यामुळंच रक्तस्त्राव होतो. इस्ट्रोजनच्या पातळीतील काही बदलांमुळं हा एंडोमेट्रीयम जाड बनून राहतो आणि ही स्थिती एंडोमेट्रीयल हायपरप्लासिया म्हणून ओळखली जाते. तसं तर हा कर्करोग नाहीये. परंतु काही प्रकरणात मात्र तो कर्करोग होऊ शकतो.

काय आहेत याची लक्षणं ?

– असामान्य मासिक रक्तस्त्राव (जास्त रक्तस्त्राव किंवा अधिक वारंवार मासिक पाळी)
– मेनोपॉझनंतरही योनीतून रक्तस्त्राव
– जास्त रक्त गेल्यानं अॅनिमिया
अशक्तपणा

काय आहेत याची कारणं ?

– लठ्ठपणा
– हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीचा दीर्घकाळ वापर
– वंध्यत्व
– पॉलिसिस्टीक ओव्हेरियन डीसीज (पीसीओडी)

काय आहेत यावर उपचार ?

1) निरीक्षण – ही सर्व सर्वात कॉमन अशी पद्धत आहे. कारण मेनोपॉझनंतर एस्ट्रोजनच्या अनुपस्थितीत हायपरप्लासिया कमी होतो किंवा याची लक्षणं कमी होतात.

2) वैद्यकीय व्यवस्थापन – स्पष्ट लक्षणं असल्यास किवा मेनोपॉझनंतरही योनीतून जर रक्तस्त्राव होत असेल तर तोंडावाटे खाण्यासाठी प्रोजेस्टेरॉनच्या गोळ्या दिल्या जातात.

3) सर्जिकल मॅनेजमेंट – काही रुग्णांमध्ये वैद्यकीय थेरपीनंतरही सतत लक्षणं दिसतात. अशा प्रकरणात एंडोमेट्रीयम हा एंडोमेट्रीयल अल्बेशन पद्धतीद्वारे साफ केला जातो. याशिवाय गंभीर प्रकरणात अंडाशयांसह संपूर्ण गर्भाशय काढलं जातं.

Tags: arogyanamaarogyanama newsbeneficial healthendometrial hyperplasiahealthhealth newsआरोग्यनामाएंडोमेट्रीयल हायपरप्लासियागर्भाशय
junk-food
फिटनेस गुरु

जंक फूड महिलांच्या आरोग्यासाठी घातक

June 14, 2019
Heart Attack
फिटनेस गुरु

Heart Attack Symptoms : ‘या’ 10 लक्षणांच्या मदतीने ओळखा हार्ट अटॅकचा धोका !

September 30, 2020
Asthma
माझं आराेग्य

दम्याची ही आहेत 8 लक्षणे, अधिक माहिती जाणून घेण्यासाठी जरूर वाचा

January 8, 2020
health
ताज्या घडामाेडी

हातपायात ‘त्राण’ राहात नसेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय

June 16, 2019

Most Popular

Covid-19 Vaccination

Covid-19 Vaccination : ‘कोरोना’ व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा घ्यावी लागेल काळजी, तेव्हाच जिंकू शकतो ही लढाई

2 days ago
Corona Vaccination

Corona Vaccination : लस घेतल्यानंतर ताप, डोकेदुखी किंवा अंग दुखत असेल तर घाबरु नका, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून दिलासा

2 days ago
आंघोळ

थंडीत रोज डोक्यावरून आंघोळ करणार्‍यांनी व्हावे सावधान, पडू शकते महागात, आंघोळ न करण्याचे अनेक फायदे

2 days ago
Eggs

Eggs and Cholesterol : जाणून घ्या, एका दिवसात किती अंडी खाल्ल्याने होणार नाही आरोग्याचे नुकसान

3 days ago
Arogyanama

We bring you the best Health News

Category

  • Family
  • Food
  • Uncategorized
  • Yoga Day Special
  • ऑफबिट
  • गॅलरी
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • ताज्या घडामाेडी
  • फिटनेस गुरु
  • माझं आराेग्य
  • योग
  • लाईफ स्टाईल
  • शेती
  • सौंदर्य

Follow Us

  • Home
  • माझं आराेग्य
  • फिटनेस गुरु
  • तज्ज्ञांचं मार्गदर्शन
  • गॅलरी
  • ताज्या घडामाेडी
  • ऑफबिट

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Arogyanama.com: Fitness, Nutrition, Tools, News, Health Magazine
  • Home
  • Home 2
  • Home 3
  • Home 4
  • Home 5
  • Sample Page

© 2021 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.