आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Elon Musk Weight Loss Secret | टेस्ला (Tesla) कंपनीचे सीईओ आणि सर्वात श्रीमंत उद्योगपती एलोन मस्क (Elon Musk) हे कोणत्या ना कोणत्या कारणाने जगभरातील लोकांमध्ये चर्चेत असतात. अलीकडेच सोशल मीडियावर आपले वजन कमी (Weight Loss) केल्याचा उल्लेख करून इलॉन मस्क हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ट्विटर खरेदीची घोषणा आणि नंतर डील रद्द केल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या एलोन मस्क यांनी ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्वतःचे वजन कमी करण्याचे रहस्य उघड केले आहे. (Elon Musk Weight Loss Secret)
एलोन मस्क यांनी सांगितले वजन कमी करण्याचे रहस्य
टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी त्यांचे वजन कमी करण्याचे रहस्य ट्विटरवर शेअर करत लिहिले आहे की, एका चांगल्या मित्राच्या सल्ल्यानुसार मी पीरियोडिकली फास्टिंग (Fasting Periodically) करण्यास सुरुवात केली आणि आता मला खूप निरोगी वाटत आहे. यासोबत मस्क यांनी वजन कमी करण्यासाठी झिरो फास्टिंग अॅप (Zero Fasting App) चे कौतुक केले आहे आणि ते खूप उपयुक्त असल्याचे म्हटले आहे.
काय आहे पीरियोडिकली फास्टिंग
स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आजकाल अनेक पद्धती अवलंबल्या जात आहेत, त्यापैकी एक म्हणजे पीरियोडिकली फास्टिंग. हे जवळपास इंटरमिटेंट फास्टिंगसारखेच आहे, ज्यामध्ये ईटिंग प्लान तयार केला जातो. या फास्टिंगमध्ये दिवसभरात ठराविक वेळेत एकदाच जेवण केले जाते आणि उरलेल्या तासांत फास्टिंग केले जाते.
इंटरमिटेंट फास्टिंग सर्वात प्रचलित पद्धत 16:8 आहे. यामध्ये व्यक्ती फक्त 8 तासातच खातो-पितो.
त्यानंतर उरलेल्या 16 तासात फक्त पाणी पिऊन उपवास करतो. याशिवाय अल्टरनेट डे फास्टिंगचा पर्याय सुद्धा काही लोक स्वीकारतात.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Elon Musk Weight Loss Secret | tesla ceo elon musk weight loss secret world richest person
Diabetes Control Tips | शुगर कंट्रोल करण्यासाठी ‘हे’ 5 नियम आहेत आवश्यक, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Vitamin-C Deficiency | व्हिटॅमिन-सी च्या कमतरतेमुळे वाढतो अनेक आजारांचा धोका, अशी भरून काढा कमतरता!