आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सामान्यांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांना आवडणारा खाद्य पदार्थ म्हणजे अंडी (Eggs) होत. अंडी सामान्यत: नाश्त्याची सर्वात सोपी डिश मानली जाते. आणि ती बनविण्यासाठी खुप वेळही लागत नाही. काहींना उकडलेले अंडी आवडतात, तर कोणीला ऑम्लेट केलेले (Eggs Side Effects). अंडे कसेही करून खा, त्यांची चव खरोखरच आश्चर्यकारक आहे. म्हणूनच ते सर्वांचे आवडते आहे. परंतु आपल्याला कदाचित हे जाणून आश्चर्य वाटेल की जास्त अंडी खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol) लवकर वाढू शकते (Eggs Side Effects).
अंड्यात प्रथिने (Protein) भरपूर असतात, यात शंका नाही. परंतु जास्त प्रमाणात अंडी खाणे प्रत्येकासाठीच आरोग्यदायी ठरतील असे नाही. अंड्याच्या पांढर्या भागात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात, शिवाय कोलेस्ट्रॉल भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे उकडलेले अंडे खात असाल तर तुमच्या हृदयाला हानी (Heart Damage) पोहोचू शकते (Eggs Side Effects).
खूप जास्त अंडी खाल्ल्यामुळे होणार्या हानीबद्दल जाणून घेऊया (Let’s Know About The Dangers Of Eating Too Many Eggs) :
उच्च कोलेस्ट्रॉल (High Cholesterol) :
फक्त एका अंड्यात १८६ मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते, तर एखाद्या व्यक्तीने दररोज फक्त ३०० मिलीग्राम कोलेस्ट्रॉल घ्यावे. पण आपण एका दिवसात बरीच अंडी खाल्ल्यास, एलडीएल (LDL), ज्याला बॅड कोलेस्ट्रॉल देखील म्हणतात, वेगाने वाढेल, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका (Risk Of Heart Disease) वाढतो. जर तुम्ही आधीच हृदयाचे रुग्ण असाल तर अंडी खाण्यावर नियंत्रण ठेवा.
सूज येणे (Swelling) :
जास्त अंडी खाल्ल्याने बर्याच जणांना पोट फुगणे आणि गॅसचा त्रास होतो. जास्त अंडी खाल्ल्याने पाचन संस्थेवर दबाव येऊन पोटात तीव्र वेदना होऊ शकतात. अनेक वेळा दुपारी किंवा संध्याकाळची अंडी खाल्ल्यानेही नुकसान होते.
मधुमेहावर घातक (Deadly On Diabetes) :
मधुमेही किंवा प्रीडायबेटिसग्रस्त (Prediabetes) लोकांनाही जास्त अंडी खाण्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.
इन्सुलिन प्रतिरोधक जोखीम वाढून अंड्यांचा रक्तातील साखरेच्या पातळीवर (Blood Sugar Level) परिणाम होऊ शकतो.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने टाइप-२ मधुमेहाचा (Type-2 Diabetes) धोकाही वाढतो.
त्यामुळे असे गंभीर दुष्परिणाम टाळण्यासाठी अंड्यांचे सेवन कमी करणे चांगले.
तुम्ही तीन दिवसांतून एकदा अंडी खाऊ शकता.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Eggs Side Effects | eating too many eggs can also trigger a lot of health issues