आरोग्यनामा ऑनलाईन – काही विशेषज्ञ सांगतात की, जास्त कोलेस्ट्रॉल असूनही अंडे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. दुसरीकडे काहींच्या मते, अंडे आरोग्यासाठी चांगले नाही. पूर्वी झालेल्या काही अध्ययनातून या दुसऱ्या दाव्याची बऱ्याच अंशी पुष्टी झाली आहे. हल्लीच झालेल्या एकाअध्ययनातून प्राप्त माहितीचे शास्त्रज्ञांनी विश्लेषण केले.
त्यात ३० हजार लोकांना समाविष्ट करण्यात आले होते व सुमारे १७ वर्षे ते सुरू होते. या अध्ययनात असे आढळून आले की, रोज ३०० मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉलच्या अतिरिक्त सेवनामुळे ह्रदयविकारांचा धोका १७ टक्क्यांनी वाढतो. अशा लोकांमध्ये विविध कारणांमुळे अकाली मृत्यूचा धोका १८ टक्के जास्त असतो. एका मोठ्या अंड्यात १८५ मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असते. हे संपूर्ण कोलेस्ट्रॉल त्यातील पिवळ्या बलकामध्ये असते.
दररोज अर्धे अंडे खाल्लायने ह्रदयाच्या आजारांचा धोका सहा टक्क्यांपर्यंत वाढतो. या अध्ययनात त्याची कारणे व प्रभाव पूर्णपणे स्पष्ट नाही, पण असे व्यक्तीने कितीही संतुलित व चांगला आहार घेतला तरी अंड्याच्या सेवनाने ह्रदयविकाराचा धोका हमखास वाढतो, असे म्हटले आहे. शास्त्रज्ञांनी सागंतिले की, अंडे व डायटरी कोलेस्ट्रॉलचे सेवन ह्रदयविकारचा धोका वाढवितात, असा दावा करण्यासाठी ही आकडेवारी पुरेसी आहे.