शरीराच्या ‘या’ ८ भागांवर सूज आल्यास करु नका दुर्लक्ष, गंभीर आजारांचे संकेत

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीराच्या कोणत्याही भागांवर सुज आल्यास काहीजण दुर्लक्ष करतात. परंतु, अशा निष्काळजीपणामुळे आरोग्याच्या अनेक प्रकारच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. अशी लक्षणे आढळल्यास वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून उपचार सुरू करा. शरीराच्या ८ भागांवर आलेली सूज कधीही दुर्लक्षित करु नका. हे कोणते आठ भाग आहेत त्याविषयी माहिती घेवूयात.

पाय
पायावर सूज येणे हा पोटाचा कँसर, प्रोटीनची कमतरता, वेरीकोस वेन्स आणि फायरेलिया समस्येचा संकेत असू शकतो.

डोळे
डोळ्यांवर सूज येणे हा अ‍ॅलर्जी, कंजेक्टिवायटिस, थायरोटॉक्सिकोसीस आणि किडनीच्या आजाराचा संकेत असू शकतो. यामध्ये डोळ्यांच्या चारही बाजूला सूज येते.

जीभ
जीभेवर सूज येणे हा अ‍ॅलर्जी, इन्फेक्शन, अंजियोडिमा आणि थायरॉइड ग्लँड मोठे होण्याचा संकेत असू शकतो.

नखे
नखांवर सूज येणे हा कँसर आणि हृदयाला छिद्र असल्याचा संकेत आहे.

चेहरा
चेहरा सूजणे हे किडनी, सायनस इन्फेक्शन आणि तंबाखूच्या कँसरचे लक्षण असू शकते.

गळा
गळ्यावर सूज येणे हा गलगंड, इन्फेक्शन आणि पेस्कॉस्ट्यूूमरचा संकेत असू शकतो. यामुळे पूर्ण गळ्यावर सूज येते.

हात
हातावर सूज येणे हा लिव्हर, किडनी आणि एडियोपॅथिम एडिमाचा संकेत आहे. यामुळे दोन्ही हातावर सूज येते.

पोट
पोटावर सूज येणे हा सिरोसिस, प्रोटीनची कमतरता, लिव्हर समस्या, पोटाचा कँसर आणि पोटाच्या टीबीचा संकेत आहे. यामुळे पोटाच्या चारही बाजूने सूज येते.