आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरात ऑक्सीजन लेव्हल वाढवणे आणि कायम राखण्यासाठी अनेक उपाय आहेत जे परिणामकारक ठरू शकतात. कोरोना संसर्गाच्या गंभीर लक्षणांपैकी एक आहे शरीरात ऑक्सीजन लेव्हल कमी होणे. तर सध्याची स्थिती पहाता ऑक्सीजन लेव्हल योग्य राखणे महत्वाचे ठरते. रक्तात 95 ते 100 टक्के दरम्यान ऑक्सीजन लेव्हल नॉर्मल मानली जाते. परंतु जर पल्स ऑक्सीमीटरमध्ये ऑक्सीजन लेव्हल 93 किंवा 90 च्या खाली असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.
उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी दररोज ‘हे’ आसन करा !
हे उपाय करा
1. आयर्न युक्त पदार्थांचे सेवन करा
हेल्दी आणि अनहेल्दी डाएटचा खुप जास्त लवकर परिणाम आपल्या शरीरावर होतो. आहारात हिरव्या पालेभाज्या विशेषता पालक, बीन्स, डाळी, मांस, अंडे, मासे खा. यामुळे शरीरातील आयर्नची कमतरता पूर्ण होते. रक्तातील ऑक्सजीन वाढतो.
शॉम्पू केल्याच्या दुसर्याच दिवशी केस तेलकट होतात? ‘हे’ घरगुती उपाय येतील तुमच्या कामाला, जाणून घ्या
2. नियमित एक्सरसाईज करा
रक्तातील ऑक्सीजन लेव्हल वाढवण्यासाठी रोज 25-30 मिनिटे व्यायाम करा. यामुळे फुफ्फुसे जास्त मात्रेत ऑक्सीजन घेऊ शकतात.
3. इनडोअर प्लांट लावा
इनडोअर प्लांट कार्बन डायऑक्साइड घेऊन आपल्याला ऑक्सीजन देतात. यासाठी घरात स्पायडर, स्नॅक प्लांट, ऐलोवेरा, मनी प्लांट, गेरबेरा डेजी यासारखी रोपं लावा.
पुस्तक वाचल्याने केवळ आपले ज्ञान वाढणार नाही तर आरोग्यासही होतील आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या
4. द्रवपदार्थ सेवन करा
शरीरात ऑक्सीजन लेव्हल वाढवण्यासाठी द्रवपदार्थ जास्त सेवन करा. विशेषता पाणी भरपूर प्या.
(टीप – सदरील लेखामध्ये दिलेली महिती ही सामान्य मान्यतेवर आधारित असून कुठलीही समस्या असेल तर डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्यावा)
पुस्तक वाचल्याने केवळ आपले ज्ञान वाढणार नाही तर आरोग्यासही होतील आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या
मलेरिया तापामुळे यकृताचे नुकसान होऊ शकते; जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंध