आरोग्यानामा ऑनलाईन टीम : उंदीर हा अतिशय उपद्रवी जीव आहे. तो घरात आणि शेतात मोठे नुकसान करू शकतो. तसेच उंदरांच्या वास्तव्यामुळे अनेक आजारही होऊ शकतात. यासाठी घरात उंदीर असल्यास त्यांचा वेळीच बंदोबस्त कराणे गरजेचे असते. उंदीर पळवून लावण्यासाठी कोणते उपाय करावेत, ते जाणून घेवूयात.
हे उपाय करा
१ कांदा
कांद्याचा वास उंदीरांना सहन होत नाही. त्यामुळे कांद्याचे काही तुकडे त्यांच्या बीळावर टाका.
२ केस
महिलांचे केसही उंदीरांसाठी घातक असतात. केस फेकण्याऐवजी ते उंदरांच्या बीळाजवळ ठेवा. उंदीर केस खाऊन मरतात.
३ पुदीना
उंदीर असलेल्या ठिकाणी पुदीन्यांचे तेल कापसाला लावून ठेवा. पुदीन्याच्या सुगंधामुळे उंदीर घरात येत नाहीत. घरात पुदीन्याचे रोपही लावू शकता.
४ तुरटी
उंदरांच्या ठिकाणी तुरटीची पावडर टाकून ठेवा. ते दूर पळतील.
५ काळीमिरी
काळे मिरे पाण्यात मिश्रित करून उंदरांच्या बीळावर ते पाणी टाका. या वासाने ते दूर पळतील.
Visit : arogyanama.com