आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मुळ्याची पाने आणि मुळ भाजीसाठी वापरले जाते. या दोन्हीत शरीराला आवश्यक असे भरपूर पोषक घटक असतात. मुळा ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. यात प्रथिने, करबोदके, लोह, फॉस्फरस भरपूर असते. उष्ण गुणधर्म असल्याने पावसाळ्यात आणि हिवाळ्यात खाणे चांगले असते. मुळ्याचे शरीराला कोणते फायदे आहेत ते जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ मुळ्याच्या ताज्या पानांचा रस मुतखड्यावर परिणामकारक ठरतो.
२ किडनीच्या विविध विकारांवरही मुळा खाणे हे औषधी ठरते.
३ वजन कमी करणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय आहे.
४ कावीळीवर फायदेशीर आहे. अनोशापोटी मुळा खाल्यास कावीळ पूर्णत: बरी होते.
५ तापावरही मुळ्याची भाजी अत्यंत गुणकारक आहे.
६ रक्ताभिसरण सुरळीत होते.
७ रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
८ डोकेदुखी, अपचन, बद्धकोष्ठता, पित्ताशयाचे खडे यावर उपयुक्त आहे.
९ मुळा रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राखते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी लाभदायक.
१० शरीराचे टॉक्सिस्न दूर होऊल त्वचा उजळते.
११ मुळ्याच्या सेवनाने सांधेदुखी दूर होते.
१२ कच्चा मुळा किंवा मुळ्याची कोशिंबीर खाल्ल्याने भूक चांगली लागते.
१३ अन्नाचे पचनही व्यवस्थित होते.
१४ सर्दी होणे, घसा खवखवणे किंवा सायनससारख्या समस्येवरदेखील उत्तम मुळा उपयुक्त आहे.
१५ व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो.