आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लाल रंगाच्या फळांमध्ये भरपूर पोषक तत्त्वे असतात. आरोग्यासाठी आहारामध्ये या फळांचा समावेश करणे गरजेचे असते. यामधील व्हिटॅमिन्स, मिनरल्स, अँटिऑक्सिडंट्स अनेक आजारांपासून आपले रक्षण करतात. यासाठीच अनेक तज्ज्ञ नियमित लाल रंगाची फळे खाण्याचा सल्ला देतात.पोटॅशियम, फायबर्स, आणि कार्बोहायड्रेट्ससारखी शरीरासाठी आवश्यक पोषक तत्त्वे स्ट्रॉबेरीत असतात. हे फळ हृदयरोगापासून आपला बचाव करते. याने इम्युन सिस्टिम मजबूत होते आणि सारखे आजारी पडणे असे त्रास बंद होतात. अस्थमा आणि गाठ्यासारख्या रोगावर स्ट्रॉबेरी परिणामकारक आहे. तसेच टोमॅटोमध्ये व्हिटॅमीन सी, लायकोपिन आणि पोटॅशियम भरपूर असते.
टोमॅटो कोलेस्टेरॉल आणि वजन कमी करण्यासाठी लाभदायक आहे. टोमॅटोचे सेवन केल्यास मधुमेहातही चांगला फायदा होतो. याच्या सेवनाने दृष्टी वाढते. तसेच त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. तर यामधील कॅल्शियममुळे हाडे बळकट होतात.तज्ज्ञ सांगतात की, सफरचंद खाण्याने कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग यांपासून बचाव होतो. तसेच दातांचा पिवळेपणा दूर होतो. सफरचंद नियमित खाल्ल्याने यकृताची कार्यक्षमता वाढते. सफरचंदाच्या सेवनाने शरीरात मुतखडा होत नाही. तसेच ऊर्जा वाढते. डाळिंबदेखील आरोग्यासाठी गुणकारी आहे. डाळिंबातील अँटिऑक्सिडंट्समुळे प्रजनन क्षमता वाढते. रोज मूठभर डाळिंबाचे दाणे खाल्ल्याने कर्करोग, तणाव, हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांना प्रतिबंध होऊ शकतो. महिलांनी गरोदरपणात हे फळ आवर्जून खावे. तसेच अॅनिमियातही ते गुणकारी आहे.
बीट हे फळदेखील आरोग्यसाठी खुप गुणकारी आहे. अँटिऑक्सिडंट, पोटॅशियम, फायबर, फॉलेट आणि व्हिटॅमिन्स बीटमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे आरोग्यासह त्वचेसाठीसुद्घा ते लाभदायक आहे. यातील पोषक तत्त्वांमुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. असेच आणखी एक लाल फळ म्हणजे कांदा होय. कांद्यामध्ये सल्फर, अमिनो अॅसिड, फायबर्स आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. यामुळे पोटाच्या आजार होत नाहीत. तसेच कांदा अॅनिमिया आणि अशक्तपणात उपयोगी आहे. यामुळे इन्सुलिन लेव्हल स्थिर राहते आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामुळे केसांची लांबी वाढते.