Eating With Empty Stomach | सकाळी रिकाम्यापोटी चुकूनही खाऊ नका ‘या’ 6 गोष्टी, आरोग्यासाठी आहेत धोकादायक; पडू शकते महागात
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Eating With Empty Stomach | सकाळी उठल्यानंतर बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाने (Tea) करतात. यानंतर त्यांना नाश्त्यात (Break Fast) ब्रेड-बटर, पोहे, समोसे, कचोरी इत्यादी खायला आवडते. बरेच लोक ज्यूस पितात. मात्र, सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी (Eating With Empty Stomach) काही गोष्टींचे सेवन करू नये. यामुळे अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात.
काही पदार्थ रिकाम्यापोटी खाल्ल्याने आतड्यांचे नुकसान (Intestinal Ischemia) होऊ शकते. त्याच वेळी, सकाळी उठल्यानंतर, नाश्ता किमान 2 तासांनी घ्यावा. सकाळी उठल्यानंतर रिकाम्यापोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये (which Foods You Should Never Have On An Empty Stomach after you wake up) ते जाणून घेवूयात…
1. मसालेदार अन्न / Spicy Food
बरेच लोक सकाळी उठून नाश्त्यात समोसे, कचोरी, भजी, यासारखे मसालेदार पदार्थ खातात. मात्र, सकाळच्या नाश्त्यात अशा प्रकारचे मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. यामुळे पोटात जळजळ, अॅसिडिक रिअॅक्शन (Acidic Reaction) आणि पोटात दुखणे (Abdominal Pain), अपचन (Indigestion) या समस्या होऊ शकतात (Eating With Empty Stomach).
2. दही / Yogurt
सकाळी उठल्याबरोबर दह्याचे सेवन करणेही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड (Lactic Acid) असते. हे तुमच्या पोटातील आम्लतेची पातळी (Acidity Level) बिघडवू शकते. तसेच सकाळी रिकाम्यापोटी याचे सेवन केल्याने पोटातील चांगले बॅक्टेरिया (Bacteria) नष्ट होतात. त्यामुळे अॅसिडिटी वाढू शकते.
3. ज्यूस / Juice
बरेच लोक सकाळी रिकाम्यापोटी ज्यूस पितात. ज्यूस शरीरासाठी चांगला असला तरी रिकाम्यापोटी तो चांगला नाही. तज्ज्ञांच्या मते, फळांच्या ज्यूसने (Fruit Juice) दिवसाची सुरुवात करू नये, कारण ज्यूस स्वादुपिंडावर (Pancreas) अतिरिक्त भार टाकू शकतो, जे शरीरासाठी चांगले नाही. रिकाम्यापोटी ज्यूस पिल्याने फळांमध्ये असलेले फ्रक्टोज (Fructose) लिव्हरवर (Liver) अधिक दबाव टाकू शकते.
4. कच्च्या भाज्या / Raw Vegetables
सकाळी रिकाम्या पोटी कच्च्या भाज्या सॅलडच्या (Salad) स्वरूपात खाऊ नयेत.
कच्च्या भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते, जे रिकाम्या पोटावर अतिरिक्त भार टाकू शकते. यामुळे पोट फुगणे आणि पोटदुखी होऊ शकते.
5. आंबट फळे / Sour Fruits
फळेआरोग्यासाठी चांगली असतात पण सकाळी रिकाम्यापोटी आंबट फळे खाल्ल्याने पोटातील अॅसिडचे उत्पादन वाढू शकते.
याव्यतिरिक्त, फळांमध्ये भरपूर फायबर (Fiber) आणि फ्रक्टोज (Fructose) असते, जे रिकाम्यापोटी खाल्ल्यास पचनक्रिया (Digestion) मंदावते.
या कारणास्तव, सकाळी नाशपाती, पेरू (Guava) आणि संत्री (Orange) यांसारखी आंबट फळे टाळावीत.
6. कॉफी / Coffee
कॉफीदेखील सकाळी रिकाम्यापोटी पिऊ नये. रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने अॅसिडिटी होऊ शकते.
तसेच यामुळे पचनक्रियेत हायड्रोक्लोरिक अॅसिडचा (Hydrochloric Acid) स्राव उत्तेजित होतो, ज्यामुळे पोटाचा त्रास होऊ शकतो.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Eating With Empty Stomach | never eat these foods and fruits in the morning an empty stomach may causes health issues
Benefits Of Cycling | सायकलिंगचे फायदे ! मधुमेह अणि हृदयविकाराचा धोका होईल कमी
Benefits Of Bindi | टिकली लावणे आरोग्यासाठी फायदेशिर ! जाणून ध्या कपाळावर टिकली लावण्याचे फायदे