आरोग्यानामा ऑनलाईन टीम : विसराळूपणा वाढला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच या समस्येकडे लक्ष द्या. एखादी वस्तू कुठे ठेवली हे आपण विसरून जातो. हे सामान्य असले तरी असे वारंवार होणे हे स्मरणशक्ती कमजोर होण्याचे लक्षण आहे. आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास स्मरणशक्ती मजबूत होऊ शकते. यासाठी कोणते पदार्थ सेवन करावे, ते जाणून घेवूयात.
1 भोपळ्याच्या बिया
यातील झिंकमुळे मानसिक आरोग्य चांगले राहते.
2 ऑलिव्ह ऑईल
चपातीवर तुपाच्या ऐवजी ऑलिव्ह ऑइल लावून खावे. मेंदूला चालना मिळते.
3 टॉमेटो
यातील अॅन्टीऑक्सिडंटमुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
4 मनुका
दररोज सकाळी 15-20 मनुके पाण्यात भिजवून खाव्यात.
हे लक्षात ठेवा
मीठ, साखर, तळलेले पदार्थ आणि फास्ट फूडचे सेवन टाळा.
Visit : arogyanama.com