आरोग्यनामा ऑनलाईन टीम –दूध आणि अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन भिजवलेलय शेंगदाण्यामध्ये असते. १०० ग्रॅम शेंगदाण्यात १ लिटर दुधा एवढे प्रोटीन असते. त्यामुळे रोज भिजवलेले शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आरोग्य विषयक अनेक समस्यांवर भिजवलेले शेंगदाणे खाणे गुणकारी आहे. भिजवलेल्या शेंगादाण्यामध्ये न्यूट्रिएंटस आणि आयरन ब्लड सर्कुलेशन व्यवस्थित ठेवून हार्ट सोबत अनेक आजारात बचाव करते.
शेंगदाणे खाल्याने आरोग्यास होणारे फायदे खालीलप्रमाणे
१) शेंगदाण्यात कॅल्शियम आणि व्हिटामिन डीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हाडेही मजबूत होतात.
२) शेंगदाण्यात ओमेगा- फॅट अधिक प्रमाणात असते. जे त्वचेसाठी उपयुक्त असते.
३) पाचनशक्तीही वाढते तसेच भूक न लागण्याची समस्याही दूर होते.
४) शेंगदाणे खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहातो.
५) जेवणानंतर ५० ते १०० ग्रॅम शेंगदाणे खाल्ल्यास शरीरात रक्ताची कमतरता होत नाही.