आरोग्यनामा ऑनलाईन टीम – आद्रकचा वापर प्राचीन काळापासून मसाल्यांमध्ये केला जातो. आद्रकचा वापर विविध आयुर्वेदिक औषधनांमध्येही केला जातो. आद्रक रोग प्रतिकारक शक्ती आणि भूक वाढवण्यात मदत करते. अशा या गुणकारी आद्रकाचे काही नुकसानही आहेत.
– ज्या लोकांनमध्ये लो शुगरचा त्रास आहे अशांसाठी आद्रक घातक ठरू शकतो. आद्रक रक्तातील साखरेचा प्रमाण कमी करतो आणि इंसुलन्सचा स्तर वाढवतो.
– आद्रकचा जास्त प्रमाणात वापर केल्याने हृद्यासंबंधीचे आजार होण्याची शक्यता असते. यामुळे आद्रकचा वापर कमी प्रमाणात करावा.
– महिलांसाठी तर जास्त प्रमाणत आद्रक सेवन धोक्याचा असतो. मासिक पाळीच्या दरम्यान रक्तस्त्राव जास्त प्रमाणात होऊ शकतो आणि याचा आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.
– आद्रक त्वचेसाठी उत्तम मानले जाते. पण काही लोकांना आद्रक पासून ऍलर्जी असल्याने त्वचेवर जळजळ होण्याची शक्यता असते. अशावेळी आद्रकचा रस त्वचेवरील काही भागात लावून पाहावा .
– आद्रकच्या अधिक सेवनाने पोटाचे विकार होण्याची ही शक्यता आहे. तसेच गॅसची समस्याही निर्माण होऊ शकते.