आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कलिंगड हे आरोग्यदायी आहे. याच्या विशिष्ट गुणांमुळे शरीराला अनेक फायदे होतात. हे शरीरकोषांमधली उष्णता कमी करते, शरीराला शितलता देते. परंतु, कलिंगड कसे खावे, याचेही काही नियम असून चुकीच्या पद्धतीने खाल्ले तर त्रास होऊ शकतो, असे काही तज्ज्ञ सांगतात. हे खाल्ल्याने रक्तदाब, हार्टअटॅकपासून रक्षण होऊ शकते.
हे आहेत फायदे
१) शरीराला गारवा मिळतो.
२) लघवीचा त्रास दूर होतो.
३) अंगावर उठणाऱ्या पुटकुळ्या दूर होतात.
४) यातील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
५) यातील लायकोपेन नावाच्या बायोफ्लेनेवॉईड उत्तम अॅन्टिऑक्सिडन्ट असल्याने रक्तातील घातक फ्री-रॅडिकल्सना कमी करते. यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो.
६) लायकोपेनमुळे स्त्रियांना हार्ट अटॅक येण्याचा धोका पन्नास टक्क्यांनी कमी होतो.
असे खा कलिंग
कलिंगड कापण्यापूर्वी स्वच्छ घ्या.
कलिंगड कापल्यानंतर जास्तीत जास्त चार तासांमध्ये खावे. अन्यथा बाधक ठरू शकते.
ही काळजी घेतली नाही तर आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो.