आरोग्यानामा ऑनलाईन टीम : वजन वाढत असल्याने अनेकजण डाएट आणि जिम हे दोन पर्याय निवडतात. तसेच काहीजण आपल्या आहारात विविध बदल करतात. वजन कमी करण्यासाठी गोडपदार्थ, फॅटयुक्त खाणे टाळावे, असे सांगितले जाते. परंतु, एवढे प्रयत्न करूनही काहीजणांना यश येत नाही. अशाप्रकारे प्रयत्न करून तुम्हीदेखील थकला असाल तर डाएटमध्ये एका खास फळ्राचा समावेश करून पहा. हे फळ म्हणजे पपई होय. स्नॅक्स, फ्रूट सलाड, मिल्कशेक, स्मुदी आणि डेझर्टच्या स्वरूपात ते खाता येते. पपई खाण्याचे फायदे जाणून घेवूयात.
हे आहेत फायदे
१ यात अनेक पोषकतत्त्व, अँटीऑक्सिडेंट, मिनरल्स असतात.
२ पपई खाल्ल्याने अन्नपचन व्यवस्थित होते.
३ शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात.
४ लिव्हरसंबंधीचे आजार दूर होतात.
५ वजन कमी होण्यास मदत होते.
६ शंभर ग्रॅम पपईमध्ये केवळ ४३ पेक्षा जास्त कॅलरीज आढळत नाही.
७ यातील अँटीऑक्सिडंटमुळे सूज आणि जळजळ कमी होते.
Visit : arogyanama.com