आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सिक्स पॅक एब्स बनविण्यासाठी अनेकजण जिममध्ये जाऊन घाम गाळतात. स्वत:च्या मनानेच आहार घेतात. परंतु, अनेकदा पदरी निराशा पडते. सिक्स पॅक एब्स बनविण्याची तुम्हाला मनापासून इच्छा असेल आणि यशस्वी व्हायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.
हे लक्षात ठेवा
१) डायटमध्ये प्रोटीन, फायबरसाठी हिरव्या भाजीपाला सेवन करा. कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ टाळा.
२) रात्रीचे जेवण हलके घ्या. सलाड किंवा फळे खा.
३) प्रथम तीन वेळेस जेवण करणे बंद करावे. त्याऐवजी पाच ते सहा वेळेस जेवण करा. हलका आणि पौष्टिक आहार घ्या. जड आहारामुळे मांस पेशींवर दबाव येतो.
४) संध्याकाळी नाश्त्यात अंड्याचा पांढरा बलक काढून त्याचे आम्लेट करून खा. यासोबत गव्हाचा ब्रेड खा.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)