आरोग्यानामा ऑनलाईन टीम – रात्री जेवण केल्यानंतरही कधीकधी अध्र्या रात्री भूक लागते. काहींना तर अशी सवय सुद्धा असते. अशा वेळी कोणते पदार्थ खावेत हा प्रश्नच पडतो. मात्र, यावेळी काही खास पदार्थ खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहील आणि भूकही मिटेल. रात्री भूक लागल्यावर गोड पदार्थ, कुकीज किंवा केक खाऊ नये. यामुळे वजन वाढू शकते. रात्री कोणते पदार्थ खावेत याविषयी माहिती घेवूयात.
गूळ
अध्र्या रात्री गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशा वेळी गूळ किंवा शेंगदाण्याची चिक्की खावी. गुळामध्ये भरपूर लोह असते, तर चिक्कीमध्ये प्रथिने असतात.
चपाती-भाजी
रात्रीच्या जेवणातील उरलेली भाजी-भाकर अध्र्या रात्री खाता येईल. मात्र, भाजी कोरडी असावी. एक भाकर आणि भाजीमध्ये २०० कॅलरी असतात.
पॉपकॉर्न
रात्रीचे जेवण आणि न्याहारी यामधील वेळ खूप नाजूक असतो. म्हणून तत्काळ पचणारे पदार्थ खावेत. अशा वेळी पॉपकॉर्न चांगला पर्याय आहे.
ओट्स आणि दूध
ओट्समध्ये थोडेसे दूध घालून खाऊ शकता. दूध शरीरामध्ये ट्रायटोफॅन्सची निर्मिती करते. त्यामुळे शरीर रिलॅक्स राहते.