आरोग्यनामा ऑनलाईन टीम – यकृत म्हणजेच लिव्हर हा शरीरातील अतिशय महत्वाचा अवयव आहे. शरीरातील अनेक महत्वाच्या क्रिया आणि कार्य यकृत करते. अयोग्य आहार आणि बदलेली जीवनशैली यामुळे लिव्हरशी संबंधीत आजार वाढत आहेत. लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी काळजी घेणे खूप आवश्यक आहे. काही खास पदार्थांचे सेवन केल्यास लिव्हरचे आरोग्य चांगले राहू शकते. हे पदार्थ कोणते ते जाणून घेवूयात.
हे पदार्थ सेवन करा
1 बीट
याच्या सेवनाने लिव्हर निरोगी राहते. सर्व क्रिया व्यवस्थित होतात. लिव्हरची क्रिया ठिक होते. रक्त शुद्ध होते.
2 लिंबू
लिंबू पाण्यामुळे लिव्हर स्वच्छ राहते. लिव्हरला पचनक्रिया वाढवणारे एंजाइम्स तयार करण्यास मदत करते.
3 लसूण
लिव्हर साफ करण्यासाठी लसूण फायदेशीर आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढले जातात.
4 पपनस
हे लिंबू फळ लिव्हर क्लीनिंग प्रोसेसमध्ये मदत करते. फ्री रेडिकल्स निकामी करते. लिव्हरला डिटॉक्सीफाय करते.