आरोग्यानामा ऑनलाईन टीम : माणसाला चांगले जीवन जगण्यासाठी चांगली दृष्टी असणे खुप गरजेचे असते. यासाठी डोळ्यांचे आरोग्य जपणे आवश्यक ठरते. कारण डोळ्यांचे आरोग्य बिघडले तर दृष्टीदोष निर्माण होतात. यामुळे जीवनावर वाईट परिणाम दिसून येतो. आहारात काही खास गोष्टींचा समावेश केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहू शकते. या गोष्टी कोणत्या ते जाणून घेवूयात.
या गोष्टी आहेत फायदेशीर
1 बदाम
यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन इ असल्याने डोळ्यांसाठी फार फायदेशीर असते.
2 अंडी
यात लूटीन, जियाक्सथीन आणि झिंक अधिक प्रमाणात असल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
3 जांभुळ
यामध्ये व्हिटॅमिन सी अधिक असल्याने मोतिबिंदूसारखी समस्या होत नाही.
4 गाजर
गाजरामध्ये ए, बी, सी, डी, ई, जी आणि के हे व्हिटॅमिन्स अधिक प्रमाणात असल्याने डोळे चांगले राहतात.
5 हिरव्या पालेभाज्या.
यांच्या सेवनाने डोळ्यांना शक्ती मिळते. दृष्टीही चांगली होते.
Visit : arogyanama.com